काबुल, 22 फेब्रुवारी : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये (Kabul) शनिवारी तीन मोठे स्फोट (Kabul Blast) झाले. या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. यामध्ये पाच नागरिकांना जीव गमवावा लागला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याची तीव्रता भयानक मोठी होती. या हल्ल्यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे.
व्हिडीओत 2 जखमी मुलं दिसत आहेत. ही दोन्ही मुलं रडताना रडताना दिसून येत असून, आपल्या जखमी आईला मदत करण्यासाठी याचना करताना दिसत आहेत. यातील एक मुलगा जखमी झालेल्या आईला उठून चालायला सांगत आहे. हा हृदयद्रावक प्रसंग सर्वांचं मन हेलावून टाकत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची मोठी चर्चा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर (Twitter) ट्रेंड होत असून या संदर्भातील हॅशटॅगदेखील ट्रेंड होत आहेत. या व्हिडीओसंदर्भात काबुल पोलिसांनी माहिती दिली असून ही दोन्ही मुलं किरकोळ जखमी असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओनंतर तालिबान्यांबरोबर सरकारच्यावतीने चर्चा करणाऱ्या फौजिया कूफी यांनी यावर भाष्य केलं आहे. आपल्या जखमी आईजवळ रडणाऱ्या या मुलांना पाहून त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप कसा होत नाही. त्यांनी आता थांबायला हवं, असं म्हटलं आहे.
काबुल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 15 मिनिटांच्या अंतरावर 2 स्फोट झाले होते. त्यानंतर 2 तासांनी आणखी एक स्फोट झाला. या हल्ल्यात पोलिसांच्या गाडीला टार्गेट करण्यात आलं होतं. मागील काही महिन्यांपासून गाड्यांमध्ये लोहचुंबकाच्या मदतीनं बॉम्ब लावण्यात येत आहे. यानंतर रिमोटच्या मदतीने त्याचा स्फोट करण्यात येतो आहे.
Humanity will also be ashamed to see this scene, Most tragic and heartbreaking scene to see the two little kids being deprived of their mother in such a brutal manner.
Today’s blast in Kabul #Afghanistan pic.twitter.com/XDYBag6jcv — Aima Khan (@aima_kh) February 21, 2021
उत्तर-काबुलच्या करण्यात आलेल्या दुसऱ्या स्फोटात एका कारला लक्ष्य करण्यात आलं होतं. यामध्ये अफगाणिस्तान राष्ट्रीय सैन्याचे सैनिक प्रवास करत होते. या स्फोटात दोन सैनिक ठार झाले आहेत. याचबरोबर एका नागरिकाला देखील या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदार कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप स्वीकारलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Bomb Blast, International, Kabul, Shocking viral video, Social media, Twitter