मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कर्ज फेडण्यासाठी आई-बापांना विकावी लागतायेत मुलं; महिलेने सांगितला भयानक अनुभव

कर्ज फेडण्यासाठी आई-बापांना विकावी लागतायेत मुलं; महिलेने सांगितला भयानक अनुभव

Afghanistan : या देशातील कुटुंबाने धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

Afghanistan : या देशातील कुटुंबाने धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

Afghanistan : या देशातील कुटुंबाने धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

अफगणिस्तान, 18 ऑक्टोबर : अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) कुटुंबाला कर्ज फेडण्यासाठी आपल्या मुलांना विकावं लागत आहे. या युद्धग्रस्त देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. देशातील पश्चिमी शहर हेरात (Herat) मध्ये घरसफाईचं काम करणाऱ्या एका असाहाय्य आईने सांगितलं की, तिच्यावर 40 हजार रुपयांचं कर्ज आहे.

कुटुंबासाठी तिने एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. वॉल स्ट्रीट जरनलच्या रिपोर्टनुसार, सलेहा नावाच्या एक महिलेला कर्ज देणाऱ्याने सांगितलं की, जर तिने तिने तिच्या 3 वर्षांच्या मुलीला मला विकलं तर तिला कर्ज माफ करण्यात येईल. हेरातमधील राहणाऱ्यांचं म्हणणं आहे की, सलेहाप्रमाणे अन्य कुटुंबालादेखील कर्ज फेडण्यासाठी आपल्या मुलांना विकावं लागत आहे. (Children have to be sold to parents to pay off debts Horrible experience told by the woman)

तालिबानने (Taliban) ऑगस्टमध्ये अफगानिस्तानवर कब्जा केला आहे. यानंतर अफगानिस्तानची अर्थव्यवस्था (Afghanistan Economy) डळमळीत झाली आहे. देशाच्या चलनात सातत्याने घट होताना दिसत आहे. खाण्याच्या सर्वसामान्य वस्तूंचा सप्लाय देखील कमी झाला असून यामुळे किमती खूप वाढल्या आहेत. यामुळे संयुक्त राष्ट्राने अफगणिस्तानला इशारा दिला आहे.

हे ही वाचा-बांग्लादेशात हिंदूंवर हल्ले सुरूच, समाजकंटकांनी पेटवली 20 कुटुंबीयांची घरं

अफगणिस्तानच्या खराब स्थितीमागील कारण?

संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी जगभरातील देशांना विनंती केली आहे की, त्यांनी अफगान अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी फॅश फ्लो वाढवा. अफगा अर्थव्यवस्थेचा तीन चतृथांश हिस्सा आतंरराष्ट्रीय सहाय्यतावर निर्भर करतो.

सलेहाने सांगितलं आपलं दु:ख...

अशात सलेहाकडे दोनचं पर्याय आहेत, एकतर तिला कर्ज फेडावं लागेल किंवा मुलांना विकावं लागेल. तिचा पती काम करीत नाही. सलेहा म्हणाली की, जर आयुष्य इतकं अवघड राहिलं तर मी मुलांची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करीन.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Economic crisis, Economy