मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भयंकर! मुलाचा मृतदेह झाडाच्या खोडात ठेवून केला जातो निसर्गाला अर्पण; 'या' देशातील अनोखी परंपरा

भयंकर! मुलाचा मृतदेह झाडाच्या खोडात ठेवून केला जातो निसर्गाला अर्पण; 'या' देशातील अनोखी परंपरा

देशातील अनोखी परंपरा

देशातील अनोखी परंपरा

वाचायला विचित्र वाटलं, तरी असं करण्यामागे त्या समुदायाचा एक विचार दडलेला आहे. मृत मुलाला झाडात ठेवल्यामुळे झाडाच्या रूपात ते मूल कायम आपल्यासोबत राहील, असं ते मानतात.

    मुंबई, 28 जून:  जगात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. त्यांच्या प्रथा-परंपराही (Cultures And Traditions) वेगवेगळ्या असतात. काही प्रथा खूपच विचित्र असतात; मात्र त्या त्या संस्कृतीमध्ये त्यांना फार महत्त्व असतं. काही परंपरा या निसर्गाशी एकरूप होण्याच्या दृष्टीनंही तयार करण्यात आल्या आहेत. इंडोनेशियातल्या एका समुदायात अशी एक वेगळी प्रथा पाळली जाते. या समुदायातल्या एखाद्या लहान मुलाचा मृत्यू झाला, तर त्या मुलाचा मृतदेह झाडाच्या खोडात (Child Buried In Tree Trunk) ठेवला जातो. वाचायला विचित्र वाटलं, तरी असं करण्यामागे त्या समुदायाचा एक विचार दडलेला आहे. मृत मुलाला झाडात ठेवल्यामुळे झाडाच्या रूपात ते मूल कायम आपल्यासोबत राहील, असं ते मानतात. इंडोनेशियातल्या (Indonasia) ताना तरोजा येथे लहान मुलांचा मृत्यू झाल्यास एक वेगळी प्रथा पाळली जाते. मोठ्या माणसांचा मृत्यू झाल्यावर इतरांसारखेच अंत्यसंस्कार इथे होतात; मात्र लहान मुलाचा मृत्यू झाला, तर त्यासाठी तिथे काही वेगळे रीतिरिवाज आहेत. मुलाचा मृतदेह झाडाच्या खोडात ठेवण्याची (Child Buried In Tree Trunk) पद्धत इथं आहे. त्यासाठी झाडाचं खोड आतून पोखरलं जातं. मग मुलाचा मृतदेह कापडात गुंडाळून तो त्या खोडामध्ये ठेवला जातो. अशा प्रकारे ते मूल झाडाचाच एक भाग बनून जातं. असं केल्यानं मृत्यूनंतरही त्या मुलाचं झाडाच्या रूपात कायमस्वरूपी अस्तित्व राहतं, अशी तिथल्या नागरिकांची भावना आहे. मुलाच्या मृत्यूमुळे दुःख तर होतंच; मात्र आपल्या मुलाला निसर्गाशी एकरूप करण्याच्या कृतीबाबत त्यांना अभिमानही वाटतो. अमेरिका सुप्रीम कोर्टाचा 50 वर्षांपूर्वीच्या गर्भपात कायद्यात बदल, होतोय विरोध इंडोनेशियातल्या मकासरपासून जवळपास 300 किलोमीटर लांब असलेल्या ताना तरोजा या भागात ही परंपरा आहे. एखाद्या कुटुंबातल्या लहान मुलाचा मृत्यू झाल्यास मुलाचा मृतदेह झाडाच्या खोडात ठेवून ते बाहेरून बंद केलं जातं. नंतर झाडालाच ते आपलं मूल समजू लागतात. त्यासाठी झाडाचं खोड पोखरण्याचं काम तेच करतात. देवानं मुलाला दूर नेलं, तरी अशा पद्धतीनं अंत्यसंस्कार केल्यानं त्यांचं मूल त्यांच्या जवळच राहतं असं त्यांना वाटतं. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची ही वेगळी पद्धत असली, तरी ती निसर्गाच्या जवळ जाणारी आहे. यामुळे त्या समुदायातली माणसं झाडाला आपलं मूल समजून झाडांची विशेष काळजीही घेत असतील. झाडं अनेक वर्षं जगतात. त्यामुळे झाडाच्या रूपात आपलं मूल या जगात असल्याची जाणीव त्या पालकांना होत असेल. निसर्गानं दिलेल्या एखाद्या गोष्टीला निसर्गालाच परत करण्याची त्यांची ही प्रथा खरोखरच अनोखी आणि निसर्गाच्या जवळ जाणारी आहे.
    First published:

    Tags: World news

    पुढील बातम्या