यापेक्षा चांगला फिल्डर तुम्ही पाहिलाय का ?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 25, 2017 04:38 PM IST

यापेक्षा चांगला फिल्डर तुम्ही पाहिलाय का ?

25 मे : क्रिकेट हा खेळ कोणाला आवडत नाही ? भारतात तर लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच क्रिकेटवेडे आहेत. म्हणूनच तर आपण गल्लीपासून ते अगदी रस्त्यापर्यंत कशालाही क्रिकेट ग्राऊंड बनवतो.

पण तुम्हीआम्ही आवडीने खेळत असलेला हा खेळ कुत्राही खेळू शकतो, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर ? होय, कारण तसा एक व्हिडिओच व्हायरल झालाय. ज्यामध्ये दोन लहान मुले व कुत्रा यांचा क्रिकेट सामना चांगलाच रंगलेला दिसतोय. यातील कुत्रा आहे फिल्डरच्या भूमिकेत. बॅटिंग करणाऱ्याने फटका मारताच तो लहानसा कुत्रा लगेच बॉल आणायला धावत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय.

कुत्रा हा प्राणी नेहमीच 'प्रामाणिक' म्हणून ओळखला जातो. म्हणूनच तो माणसाचा एक चांगला मित्रही आहे. आणि आता या व्हिडिओमधून पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dogfielder
First Published: May 25, 2017 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...