• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • 8 वर्षांच्या मुलीला घेतलं दत्तक पण ती निघाली 30 वर्षांची,आईवडिलांचा करणार होती खून

8 वर्षांच्या मुलीला घेतलं दत्तक पण ती निघाली 30 वर्षांची,आईवडिलांचा करणार होती खून

ज्या बर्नेट दांपत्याने नतालियाला दत्तक घेतलं ते दोघंही तिला एकटीला घरात ठेवून कॅनडाला निघून गेले. या मुलीने आपल्या खुनाचा कट रचला, असंही त्यांचं म्हणणं आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 9 ऑक्टोबर : एका अमेरिकन दांपत्याने 2010 मध्ये एका 8 वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं. काही दिवसांनी मात्र तिच्या शारिरीक प्रगतीबद्दल त्यांना संशय आला. त्यांनी डॉक्टरांना दाखवलं तेव्हा ही मुलगी 8 वर्षांची नाही तर 14 वर्षांपेक्षा मोठी असल्याचं लक्षात आलं. एवढंच नव्हे तर ती मुलगी तिच्या आईच्या सांगण्यावरून या दोघांच्या खुनाचा कट रचत होती. नतालिया नावाची ही मुलगी एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. आता तिला दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी तिला सोडून दिल्यामुळे तिची रवानगी क्रिमिनल केस केंद्रात करण्यात आली आहे. या मुलीचं वय 30 वर्ष असावं, असा अंदाज आहे. मुलीच्या आईच्या मते मात्र ती 16 वर्षांचीच आहे. आपली मुलगी विकलांग असल्यामुळे तिला आपण दत्तक दिलं, असं तिची आई म्हणाली. आपली मुलगी अमेरिकेत असल्यामुळे सुखी असेल असं मला वाटत होतं, असंही नतालियाच्या आईचं म्हणणं आहे.नतालिया मूळची यूक्रेनची आहे. (हेही वाचा : SBI मध्ये मुलीच्या नावाने उघडा खातं, मोदी सरकारची विशेष योजना) ज्या बर्नेट दांपत्याने नतालियाला दत्तक घेतलं ते दोघंही तिला एकटीला घरात ठेवून कॅनडाला निघून गेले. या मुलीने आपल्या खुनाचा कट रचला, असंही त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांना नतालिया एका फ्लॅटमध्ये सापडली. बर्नेट दांपत्यावर आता या मुलीला सोडून देण्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पण हे दत्तक विधानच बेकायदेशीर होतं,अशी या दांपत्याची तक्रार आहे. ========================================================================================== राज ठाकरेंच्या पहिल्या सभेत पाणीच पाणी, पाहा हा LIVE VIDEO
  Published by:Arti Kulkarni
  First published: