मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

प्रेषित मोहम्मदांनंतर आता 'शार्ली हेब्दो'कडून हिंदू धर्माचा उपहास, कोरोना हाहाकारावरून देवतांवर टिप्पणी

प्रेषित मोहम्मदांनंतर आता 'शार्ली हेब्दो'कडून हिंदू धर्माचा उपहास, कोरोना हाहाकारावरून देवतांवर टिप्पणी

'भारतात 33 कोटी देव आहेत. पण एकालाही ऑक्सिजनची निर्मिती करता येत नाही', भारतात सुरू असलेल्या कोरोना हाहाकारावर टिप्पणी करताना या फ्रेंच मॅगझिनने या अर्थाची ओळ लिहित चित्र प्रकाशित केलं आहे.

'भारतात 33 कोटी देव आहेत. पण एकालाही ऑक्सिजनची निर्मिती करता येत नाही', भारतात सुरू असलेल्या कोरोना हाहाकारावर टिप्पणी करताना या फ्रेंच मॅगझिनने या अर्थाची ओळ लिहित चित्र प्रकाशित केलं आहे.

'भारतात 33 कोटी देव आहेत. पण एकालाही ऑक्सिजनची निर्मिती करता येत नाही', भारतात सुरू असलेल्या कोरोना हाहाकारावर टिप्पणी करताना या फ्रेंच मॅगझिनने या अर्थाची ओळ लिहित चित्र प्रकाशित केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 14 मे : फ्रान्सचे व्यंगचित्र मासिक शार्ली हेब्दोने (Charlie Hebdo) भारतातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आणि मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर टीका करताना हिंदू धर्मातील (Hindu Religion) श्रद्धेला लक्ष्य केले आहे. या मासिकाने हिंदूंच्या श्रद्धेचा उपहास करताना ‘भारतात कोट्यवधी देवता आहेत. पण ऑक्सिजनची कमतरता कोणालाही भरून काढता येत नाही,’ असे लिहिले आहे. या व्यंगचित्रात मोठ्या संख्येनं लोक ऑक्सिजन सिलिंडर्ससह खाली पडलेले आहेत.

मासिकाने कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या परिस्थितीत आरोग्य सुविधा किंवा कोरोना फैलाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमधील त्रुटींविषयी न लिहिता हिंदूंच्या श्रद्धेला लक्ष्य केलं असल्याची टीका होत आहे. विश्वात एकंदरित 33 कोटी देवता असल्याची हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. याबाबत काही जण ’33 कोटी’ (अंकी – 33,00,00,000) असे तर, काही जण ’33 कोटी’ म्हणजे 33 प्रकारच्या (संस्कृत भाषेत ‘कोटि’ शब्दाचा ‘प्रकार’ असाही अर्थ आहे.) देवता असल्याचे विश्लेषण करतात. मात्र, या मासिकानं  ‘33 million’ म्हणजे 33 दशलक्ष किंवा 3.3 कोटी असे लिहिले आहे.

हे चित्र शार्ली हेब्दोने खरंच प्रसिद्ध केलं होतं का, याची शहानिशा झालेली नाही. हे चित्र या अकाउंटवरून एप्रिलमध्येच प्रसिद्ध झाल्याचं दिसतं.

यापूर्वी शार्ली हेब्दो या फ्रेंच मॅगझीनने प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र काढून वाद ओढवून घेतला होता. या मासिकाच्या ऑफिसला अनेक कट्टरवाद्यांनी लक्ष्यही केलं होतं. आता हिंदू धर्माविषयी टिप्पणी करून त्यांनी हिंदूंचा रोष ओढवून घेतला आहे.

भारतातल्या काही सोशल मीडिया पर्सनॅलिटीजनी हे चित्र शेअर केलं आणि ते अचानक व्हायरल झालं. त्यावर डाव्या-उजव्यांकडून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारतीय लोकांनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच, हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याचे म्हटले आहे. मासिकानं हे व्यंगचित्र फेसबुक अकाऊंवरून शेअर केलं आहे. याला आतापर्यंत शेकडो लोकांनी शेअर केलं आहे. या व्यंगचित्राचा भारतातील बर्‍याच लोकांनी निषेध केला आहे. बर्‍याच लोकांनी याला भारताच्या आरोग्य सेवेवर टिंगल करण्याऐवजी हिंदू समाजाची खिल्ली उडविणारे व्यंगचित्र म्हणून म्हटले आहे.

काही लोकांनी या व्यंगचित्राला अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी जोडलं आहे. फ्रान्सच्या शार्ली हेब्दो मासिकानं बर्‍याचदा धार्मिक विषयांवर व्यंगचित्रांद्वारे टीका-टिप्पणी केली आहे. मुस्लीम धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचंही व्यंगचित्र मासिकानं छापलं होतं. यानंतर मासिकाच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मासिकाचे अनेक वरिष्ठ व्यंगचित्रकार ठार झाले. तथापि, मासिकानं अद्याप आपली भूमिका बदललेली नाही. हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. याचा ते वापर करत राहतील, असे मासिकाने म्हटलं आहे. काही जणांनी चार्ली हेब्दोचं हे व्यंगचित्र एक धडा म्हणून पाहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: France, Hindu