मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानात MOB LYNCHING प्रकरणात कारवाई, 800 जणांवर दहशतवादाचे गुन्हे

पाकिस्तानात MOB LYNCHING प्रकरणात कारवाई, 800 जणांवर दहशतवादाचे गुन्हे

पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये श्रीलंकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी 800 जणांवर दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये श्रीलंकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी 800 जणांवर दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये श्रीलंकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी 800 जणांवर दहशतवादाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    लाहौर, 5 डिसेंबर: पाकिस्तानमध्ये झालेल्या मॉब लिंचिंग प्रकऱणात सरकारनं पावलं उचलली असून 800 जणांवर दहशतवादाचे गुन्हे दाखल केले आहेत. धार्मिक भावना दुखावल्याचं कारण पुढे करत हजारो जणांच्या जमावानं एका श्रीलंकन नागरिकाची हत्या केली होती. या घटनेची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्यानंतर धाबे दणाणलेल्या पाकिस्ताननं आता कारवाईची पावलं उचलायला सुरुवात केली असून 118 जणांना अटक करण्यात आलं आहे. अशी घडली घटना पाकिस्तानात शुक्रवारी एका कट्टर इस्लाम समर्थक पक्षाच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी श्रीलंकन नागरिकाची हत्या केली होती. या जमावाने घोषणाबाजी करत प्रियंता कुमारा नावाच्या तरुणावर हल्ला चढवला होता. त्याची हत्या झाल्यानंतर जमावाने मृतदेहदेखील पेटवून दिला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप प्रियंता कुमार यांच्यावर जमावाने केला होता. पाकिस्तानची राजधानी लाहौरपासून 100 किलोमीटर अंतरावर सियालकोट जिल्ह्यात असणाऱ्या कपड्यांच्या कंपनीत ते महाप्रबंधक म्हणून कार्यरत होते. पोस्टर फाडल्यामुळे संतापले समर्थक प्रियंता कुमार ज्या कंपनीत काम करत होते, त्या कंपनीच्या भिंतीला तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या पक्षाचं एक पोस्टर लावण्यात आलं होतं. या पोस्टरवर कुराणातील काही ओळीदेखील लिहिण्यात आल्या होत्या. प्रियंता कुमारा यांनी हे पोस्टर फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं होतं. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. त्यानंतर संतापलेल्या समर्थकांनी कुमारा यांच्यावर हल्ला चढवला होता. हे वाचा- मैत्रिणीचं ATM कार्ड चोरून केली शॉपिंग; मग बेस्टफ्रेंडवरच चाकूने केला हल्ला अन् सरकारकडून कारवाईला सुरुवात या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाल्यानंतर सरकारनं कारवाईची पावलं उचलायला सुरुवात केली असून एकूण 800 जणांविरोधात दहशतवादाचा आरोप ठेवत गुन्हे दाखल केले आहेत. 118 संशयितांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यातील 13 विशेष संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Pakistan, Police, Sri lanka, Terrorist

    पुढील बातम्या