परदेशात राहणाऱ्या 17 भारतीयांना coronavirus ची लागण
परदेशात राहणाऱ्या 17 भारतीयांना coronavirus ची लागण
आत्तापर्यंत पुण्यात 1366 जणांचा मृत्यू झाला. तर 38117 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं.
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असतांना भातर त्यापासून दूर राहीलेला नाही. भारतात आत्तापर्यंत २९ जणांना कोरोना झाल्याचा संशय आहे. यामध्ये इराणहून आलेल्या काही पर्यंटकांचा समावेश आहे. पण भारताच्या दृष्टीने आणखी महत्वाचा बाब म्हणजे विदेशात राहणाऱ्या १७ भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
नवी दिल्ली, 4 मार्च : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असतांना भारत त्यापासून दूर राहिलेला नाही. भारतात आत्तापर्यंत 29 जणांना कोरोना झाल्याचा संशय आहे. यामध्ये इराणहून आलेल्या काही पर्यंटकांचा समावेश आहे. पण भारताच्या दृष्टीने आणखी महत्वाचा बाब म्हणजे विदेशात राहणाऱ्या 17 भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. लोकसभेत बोलतांना परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ही माहिती दिली. सरकारच्यावतीने पहिल्यांदाच अशी माहिती देण्यात आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना 'कोरोना' ( coronavirus ) चा संसर्ग झाल्याची पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर आली आहे.
कुठे आहेत कोरोनाग्रस्त भारतीय?
जपान 16
UAE 01
जपानमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं उघड होताच 'वुहान' प्रांतातल्या ज्या ज्या भारतीयांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली अशा सगळ्यांना भारत सरकारच्यावतीने विशेष व्यवस्था करून माघारी आणण्यात आलं.
वाचा : हुश्श! भारतातील उन्हाळ्यात नाही टिकणार कोरोना! प्रमुख भारतीय वैज्ञानिकाचा दावाचीनमधून अशा प्रकारे 119 नागरिकांना भारतात सुखरूप आणण्यात आलं. हे सगळे जपानमधे शिक्षण, नोकरीसाठी गेले होते. तर जगभरातल्या 12 देशातल्या नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. परदेशात राहणाऱ्या ज्या 17 भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे त्यातले 16 जणं हे जपानमधले आहेत आणि ते एक भारतीय युएईमधला (UAE) आहे.
आयपीएलचं काय होणार?
आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. पहिलाच सामना मुंबईत होणार असून इतर सामना चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद अशा शहरांमध्येही होणार आहे. कोरोनामुळं आयपीएल स्पर्धा रद्द होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला असताना, बीसीसीआयनं याबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे.
बीसीसीआयचे सदस्य आणि आयपीएल संचालन समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी, कोरोनाचा आयपीएलला काहीही धोका नसल्याचे सांगितले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यामुळे सर्वात महागड्या अशा टी -20 क्रिकेट स्पर्धेला धोका निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे मत ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, सर्दी झाल्यावर आणि खोकला आल्यावर रुमाल वापरणे आवश्यक असून अशा परिस्थितीत स्वच्छता आणि काळजी घ्यावी. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी चांगला आहार ठेवावा. उपचार करुन हा आजार बरा होतो. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
अन्य बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.