Elec-widget

व्हाॅटस्अॅप ग्रुपवर सुरू होता चाईल्ड पाॅर्न ग्रुप, सीबीआयने केला रॅकेटचा पर्दाफाश

व्हाॅटस्अॅप ग्रुपवर सुरू होता चाईल्ड पाॅर्न ग्रुप, सीबीआयने केला रॅकेटचा पर्दाफाश

अमेरिका,चीन,पाकिस्तान,अफगाणिस्तान,मेक्सिको,ब्राझील या देशांमधले लोक यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती मोठी आहे.

  • Share this:

22 फेब्रुवारी : व्हॉटस्अॅपच्या माध्यामातून चालणाऱ्या चाईल्ड पॉर्नोग्राफी रॅकेटचा सीबीआयनं पर्दाफाश केलाय. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे हे रॅकेट व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून चालवले जात असल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलीये.

या ग्रुपमध्ये 199 सदस्य होते आणि या व्हॉट्सअॅप ग्रुपचा ग्रुप अॅडमीन निखिल वर्माला सीबीआयनं अटक केलीये. चाईल्ड पोर्नोग्राफी अपलोड आणि डाऊनलोड करण्यासाठी या ग्रुपचा वापर करण्यात येत होता. या ग्रुपचे किमान पाच संचालक हे भारतीय असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिलीये. आणि त्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय.

दिल्ली,मुंबई, नोएडामध्ये धाडी टाकण्यात आल्यात. धाडी टाकण्यात आलेल्या आरोपींच्या घरुन लॅपटॉप,मोबाईल जप्त करण्यात आलंय. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सापडलेत. हा कुठलाही साधारण व्हॉट्सअॅप ग्रुप नसून यामध्ये विविध देशांचे लोक सहभागी आहेत.

अमेरिका,चीन,पाकिस्तान,अफगाणिस्तान,मेक्सिको,ब्राझील या देशांमधले लोक यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती मोठी आहे.

सीबीआयला जेंव्हा पहिल्यांदा या ग्रुपबाबत माहिती मिळाली, त्यानंतर अंडर कव्हरचा वापर न करता त्यांनी आयपी अॅडरेसवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. या रॅकेटमध्ये गुंतलेल्या लोकांना पकडण्यासाठी सीबीआय इंटरपोलची मदतही घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2018 09:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...