Home /News /videsh /

'माझी मांजर मुळीच खोडकर नाही', मालकिणीने 3 वर्षे लढला खटला, मिळवली 95 लाखांची भरपाई!

'माझी मांजर मुळीच खोडकर नाही', मालकिणीने 3 वर्षे लढला खटला, मिळवली 95 लाखांची भरपाई!

Cat Owner Wins 95 Lakh as Compensation : मांजरीवर शेजाऱ्यांनी गैरवर्तन आणि इतर प्राण्यांना मारल्याचा आरोप केला होता, ज्यासाठी मालकिणीने 3 वर्षे खटला लढला (Cat Owner fought for pet cat) आणि अखेरीस ती जिंकली.

    वॉशिंग्टन, 11 मे : सर्वाधिक आवडत्या पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा आणि मांजर या प्राण्यांचा (Pet and Owners) समावेश आहे. ज्या लोकांना मांजरी आवडतात, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी ठरू शकते. एखाद्या वेळेस मांजर तुम्हाला 95 लाख रुपये मिळवून देऊ शकते. अमेरिकेत (Unites States News) पाळीव मांजरीसाठी लढलेल्या एका खटल्यात (Cat Owner fought for pet cat) मांजरीच्या मालकिणीला 95 लाख रुपये मिळाले आहेत (Cat Owner Wins 95 Lakh as Compensation). ही संपूर्ण कथा फारच रंजक आहे. अ‍ॅना डॅनिएली (Anna Danieli) नावाच्या अमेरिकन महिलेने एक मांजर पाळली आहे. मांजरीचे नाव मिस्का (Miska) आहे. 3 वर्षांपूर्वी वेगवेगळ्या घटनांसाठी मिस्काला 30 दंड (fines) आणि काही व्हायलेशन चार्जेस (Violation charges) ठेवण्यात आले होते. मांजरीच्या गैरवर्तणुकीच्या तक्रारीनंतर तिच्या मालकिणीला एकूण 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. अ‍ॅनाची मांजरही पशू नियंत्रण कार्यालयाने (Animal Control Office) तिच्या मालकीतून काढून घेतली. हे वाचा - VIDEO: समुद्रकिनारी वाहून आला 'रहस्यमयी रथ'; भारतात कुठून आणि कसा पोहोचला? मांजरीबद्दल खूप तक्रारी हे प्रकरण 2019 सालचे आहे. अ‍ॅना डॅनिएलीच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅनिमल कंट्रोल ऑफिसचे अनेक अधिकारी अ‍ॅनाच्या घराजवळ राहत होते. मांजरीच्या वाईट वागणुकीबद्दल त्यांनी तक्रार केली होती. त्यांनी तक्रार केली की, मिस्का मुक्तपणे हिंडते आणि तिच्या परिसरातल्या इतर प्राण्यांना मारते. त्यामुळे इतर प्राणी घाबरतात. या तक्रारीमुळे अ‍ॅना डॅनिएली यांना 25,000 पाउंड म्हणजेच 23 लाख रुपयांपेक्षा जास्त भारतीय चलनात दंड ठोठावण्यात आला. एवढंच नाही तर, मांजरीची मालकीही अ‍ॅनाकडून काढून घेतली गेली. हे वाचा - अवघे 4 सेकंद अन् अनियंत्रित कारच्या कचाट्यात सापडले 6 जण; भीषण अपघाताचा VIDEO खटल्याच्या 3 वर्षानंतर 95 लाखांची भरपाई मिळाली मिररच्या वृत्तानुसार, मांजरीवरील आरोप आणि तिच्यासोबतच्या या वागणुकीमुळे दुःखी झालेल्या अ‍ॅनाने हे प्रकरण न्यायालयात नेणं योग्य मानलं. त्यांनी वकिलाच्या मदतीने केस दाखल केली आणि ती 3 वर्षे चालली. नुकताच या प्रकरणी निकाल देताना कोर्टानं हे मान्य केलं की, मांजर खोडकर नाही आणि तिच्यामुळे परिसरात कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. मांजर निर्दोष असल्याचं लक्षात घेऊन न्यायालयाने अ‍ॅनाला £1,00,000 म्हणजेच एकूण 95 लाख रुपये भारतीय चलनात भरपाईही दिली आहे. अ‍ॅनाच्या वकिलाचं म्हणणं आहे की, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामध्ये वॉशिंग्टनमधील पाळीव मांजरीच्या हक्कांचं पहिल्यांदाच संरक्षण करण्यात आलं आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Cat, Pet animal

    पुढील बातम्या