शॉपिंगला जातांना कार लॉक न करणं पडलं महाग, तासाभरानंतर दार उघडताच त्या दोघांचं फुटलं बिंग

शॉपिंगला जातांना कार लॉक न करणं पडलं महाग, तासाभरानंतर दार उघडताच त्या दोघांचं फुटलं बिंग

मॉलमध्ये गर्दी नसल्याने आणि तासाभरातच परत यायचं असल्याने त्या तरुणीने गाडी लॉक करण्याचा कंटाळा केला. तिथे भटकणाऱ्या एका तरुण आणि तरुणीने ती संधी शोधली आणि कारमध्ये बस्तान मांडलं.

  • Share this:

शोजोंग12 जुलै: कोरोनामुळे लॉकडाऊन (Lockdown) असल्याने अनेक देशांमध्ये दुकाने आणि मॉल्स बंदच होती. आत कुठे काही देशांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवहार पूर्वपदावर येत आहे. चिलीमध्येही आता मॉल्स सुरू झाले आहे. अनेक महिन्यानंतर खरेदीसाठी मॉल्समध्ये आलेल्या तरुणीला पहिल्याच दिवशी धक्कादायक अनुभव आला. तासाभरानंतर ती जेव्हा परत आली तेव्हा कारचा ताबा एका जोडप्याने घेतला होता. एक साधी चूक तिला चांगलीच महागात पडली.

मॉलमध्ये गर्दी नसल्याने आणि तासाभरातच परत यायचं असल्याने त्या तरुणीने गाडी लॉक करण्याचा कंटाळा केला. तिथे भटकणाऱ्या एका तरुण आणि तरुणीने ती संधी शोधली आणि कारमध्ये बसून त्यांनी अश्लील चाळे करायला सुरूवात केली. पार्किंगचा मोठा असलेला परिसर आणि तुरळक वाहतूक यामुळे या तरुणांचे हे चाळे कुणाच्याच लक्षात आले नाहीत.

शॉपिंगला गेलेली गाडीची मालक लवकर परत येणार नाही असं त्यांना वाटलं होतं त्यामुळे त्यांनी बिनधास्तपणे आपल्या लीला सुरूच ठेवल्या. तासाभरानंतर जेव्हा गाडीची मालकीन आली आणि कारचा दरवाजा तिने उघडताच आतमध्ये असलेल्या या दोघांनाही पाहून तिला धक्काच बसला.

हे वाचा - पाहू डोळे भिरभिरतील मात्र तरी कोणता झेब्रा समोर आहे ते ओळखा बरं...

तिने लगेच शॉपिंग मॉलच्या मालकाकडे तक्रार केली आणि सुरक्षा गार्ड्सनी त्या बेधुंद जोडप्याला ताब्यात घेतलं. त्यांना आता पोलिसांच्या स्वाधीन देण्यात येणार आहे. तर शॉपिंगसाठी येणाऱ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी. आपली कार पूर्ण लॉक झाली की नाही याची खात्री करा आणि मगच कारपासून दूर जा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. कारमध्ये महत्त्वाच्या वस्तू ठेवू नका असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 12, 2020, 7:58 PM IST

ताज्या बातम्या