मुंबई, 8 जानेवारी : अमेरिकन (US) संसद कॅपिटॉल हिलवर (Capitol Hill) ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा जगातील बहुतेक देशांनी निषेध केला आहे. याचवेळी इराण (Iran), रशिया (Russia) आणि चीन (China) या देशांनी या मुद्यावर अमेरिकेला उपदेशाचा डोस देण्याची संधी सोडली नाही. चीनी मीडियानं याबात एक पाऊल पुढं टाकत ‘एक सुंदर दृश्य’ असा टोला लगावला आहे. तर रशियानं या घटनेचं वर्णन ‘एक कमकुवत लोकशाही’ असं केलं आहे.
चीनची प्रतिक्रिया काय?
‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये आलेल्या बातमीनुसार चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) या प्रकरणावर एक लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात चीनी नागरिकांच्या सोशल मीडिया पोस्टचा आधार देण्यात आला आहे. ‘अमेरिकेत जे घडलं ते त्यांच्या कर्माचं फळ आहे. त्यांच्या लोकशाहीचा फुगा फुटला आहे. हाँगकाँगमध्ये विरोधकांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी अमेरिकेनं त्यांची प्रशंसा केली होती, सुंदर दृश्य असं त्याचं वर्णन केलं होतं’ याची आठवणही ग्लोबल टाईम्सनं करुन दिली.
.@SpeakerPelosi once referred to the Hong Kong riots as "a beautiful sight to behold" — it remains yet to be seen whether she will say the same about the recent developments in Capitol Hill. pic.twitter.com/91iXDzYpcO
— Global Times (@globaltimesnews) January 7, 2021
इराणची ट्रम्प सरकारवर टीका
इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी अमेरिकेतील हिंसाचाराचा निषेध करताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर टीका केली आहे. इराणची सरकारी न्यूज एजन्सी ‘इस्लामिक रिपब्लिक’ नं दिलेल्या वृत्तानुसार ‘लोकांचं लक्ष वेधून घेणारा नेता काय करु शकतो हे अमेरिकेतील घटनांनवरुन स्पष्ट झालं आहे. एक चुकीचा व्यक्ती स्वत:च्या हातात सत्ता घेतो आणि सर्व जगाचे अमेरिकेसोबत असलेले संबंध खराब होतात. त्याचबरोबर तो स्वत:चा त्याचा पराभव निश्चित करतो.’’ अशी टीका इराणच्या सरकारी न्यूज एजन्सीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केली आहे.
रशियाचा निवडणूक पद्धतीवर आक्षेप
‘अमेरिकेतील लोकशाही अडखळली आहे, ती आणखी रसातळाला जाणार आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो,’ असा दावा रशियातील खासदार खुश्चेव यांनी केला आहे. सर्व जगाची दिशा ठरवणाऱ्या अमेरिकेला स्वत:ची वाटचाल कोणत्या दिशेनं होत आहे, हे समजत नाही, असंही ते म्हणाले.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जकरोव्हा यांनीही अमेरिकन निवडणूक पद्धतीवर टीका केली आहे. अमेरिकेतील निवडणूक पद्धत ही खूप जुनी आहे. आधुनिक लोकशाहीमध्ये याच्या आधारावर काम करणं अवघड आहे, असं त्यांनी सांगितलं.
The #USCapitol raid exposes the fault lines within the American democracy - Russia's FM spokeswoman https://t.co/ZMqJP0qFWK
— RT (@RT_com) January 7, 2021
तुर्कस्तान आणि ब्रिटनचाही टोला
'अमेरिकेनं कॉमन सेन्सचा वापर करावा', असा सल्ला तुर्कस्ताननं दिला आहे. त्याचवेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अमेरिकेत झालेल्या हिंसाचारामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सातत्यानं निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि समर्थकांना कॅपिटोल हिलमध्ये घुसण्यासाठी प्रवृत्त केलं, असा दावा जॉन्सन यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump