मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'कॅपिटॉल हिलमधील हिंसाचाराला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार'

'कॅपिटॉल हिलमधील हिंसाचाराला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार'

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या कार्यकाळातही अमेरिकेतील लोकशाही यंत्रणा मनमानीपणे वाकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच आज वॉशिंग्टनमध्ये अशा हिंसक घटना घडल्या आहेत, असंही बायडेन यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या कार्यकाळातही अमेरिकेतील लोकशाही यंत्रणा मनमानीपणे वाकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच आज वॉशिंग्टनमध्ये अशा हिंसक घटना घडल्या आहेत, असंही बायडेन यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या कार्यकाळातही अमेरिकेतील लोकशाही यंत्रणा मनमानीपणे वाकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच आज वॉशिंग्टनमध्ये अशा हिंसक घटना घडल्या आहेत, असंही बायडेन यांनी म्हटलं आहे.

    वॉशिंग्टन,08 जानेवारी : अमेरिकन काँग्रेसने निवडलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी गुरुवारी अमेरिकेतील कॅपिटल हिल (Capitol Hill) मध्ये हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांना देशांतर्गत अतिरेकी म्हटलं असून या हिंसाचारसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं आहे. ट्रम्प समर्थकांनी बुधवारी सुरक्षा व्यवस्था तोडून जो धुडगूस घातला, हिंसक कृत्ये केली तो निव्वळ निषेध नव्हता की नियमांचं उल्लंघन नव्हतं तर ती दंगल होती. अमेरिकन कॉंग्रेसची बैठक उधळून लावण्याच्या हेतूनं, ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिल इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला, तोडफोड केली. त्यांना निषेध करणारे आंदोलनकर्ते म्हणणे अयोग्य आहे, हे तर देशातीलच दहशतवादी, देशद्रोही (Domestic Terrorists) आहेत, अशी घणाघाती टीका बायडेन यांनी केली आहे.

    डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या कार्यकाळातही अमेरिकेतील लोकशाही यंत्रणा मनमानीपणे वाकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच आज वॉशिंग्टनमध्ये अशा हिंसक घटना घडल्या आहेत, असंही बायडेन यांनी म्हटलं आहे. गेल्या चार वर्षांत आपल्याला एक असे अध्यक्ष लाभले ज्यांनी लोकशाहीचा, अमेरिकेच्या राज्यघटनेचा, कायद्याच्या राज्याच्या अपमान केला आहे. आमच्या लोकशाही संस्थांवर त्यांनी आघात केले, काल झालेल्या घटना तर या सर्व कृत्यांचा कळस होत्या, असंही बायडेन यांनी म्हटलं आहे.

    हे वाचा-मेड इन चायना कोरोना लशीचे 73 Side effect; चिनी डॉक्टरनंच केली पोलखोल

    कॅपिटल हिल परिसरातील कॅपिटलभवनमध्ये हजारोंच्या संख्येनं ट्रम्प समर्थक घुसले, त्यांनी संसदेच्या प्रतिनिधींनां लक्ष्य करून त्यांच्या कामकाजात अडथळा आणला, त्यामुळं संसद सदस्यांना सुरक्षित स्थळी न्यावं लागलं आणि अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया अपूर्ण ठेवावी लागली. मतमोजणीत गैरव्यवहार झाल्यानं आपण निवडणूक हरल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनीच जमावाला चिथावलं. ट्रम्प यांचे दावे सर्वोच्च न्यायालयासह अन्य स्थानिक न्यायालयं, दोन्ही पक्षांचे राज्य निवडणूक अधिकारी इतकेच नव्हे तर ट्रम्प यांच्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही फेटाळले आहेत. मात्र ट्रम्प निकाल आपल्या बाजूनं वळवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहिले. रिपब्लिकन पक्षाचा लहान गट ते संसदेतील सिनेटर्सनी कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसक घडामोडींचा निषेध केला आहे.

    या सगळ्या घडामोडीनंतर बुधवारी रात्री उशिरा अमेरिकन संसदेत राष्ट्राध्यक्ष निश्चितीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आणि गुरुवारी पहाटे जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.

    First published:

    Tags: Donald Trump, United States of America