मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचार प्रकरणी अमेरिकेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी का मागितली माफी?

कॅपिटॉल हिलवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचार प्रकरणी अमेरिकेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी का मागितली माफी?

Donald trump supporters

Donald trump supporters

अमेरिकेतील कॅपिटॉल हिलमध्ये (Capitol Hill) डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराबद्दल आता देशातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर अनेक अधिकाऱ्यांना मानसिक धक्का बसला आहे.

कॅपिटल हिल्स, 27 जानेवारी :अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल्सवर (Capitol Hill) केलेल्या हिंसाचारप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने माफी मागितली आहे. ट्रम्प समर्थकांनी केलेला हल्ला थांबविण्यास अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्याने हिंसाचारावेळी झालेल्या अनेक चुकांचा उल्लेख करत या पुढे आपली गुप्तचर यंत्रणा आणखी मजबूत करणार असल्याचे सांगितले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्या चुका या पोलिस अधिकाऱ्याने अनेक चुकांचा उल्लेख करत सांगितले की, 'इंटेलिजेन्स इनपुट विरोधाभासी होते. एवढ्या मोठ्या गर्दीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नव्हती. या व्यतिरिक्त अन्य एजन्सीसोबत योग्य पद्धतीने संपर्क करता आला नाही.' तसंच, कॅपिटल पोलिसांचे कार्यकारी प्रमुख योलान्डा पिटमॅन (Yolanda Pittman) यांनी यूएस हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हसाठी तयार केलेल्या निवेदनात 'मी इथे माझ्या विभागाच्या वतीने सर्वांसमोर माफी मागतो. आमचा विभाग आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.', असं म्हटलं आहे. या एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती 6 जानेवारीला अमेरिकेतील कॅपिटल हिल्सवर झालेल्या हल्ल्याबद्दल (US Capitol Hill Violence) अनेक सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांनी कमिटीसमोर आपलं निवेदन दिलं आहे. एफबीआय, नॅशनल गार्ड, अमेरिकेचा न्याय विभाग आणि यूएस कॅपिटल हिल्स पोलिसांनी हाऊससमोर आपलं निवेदन दिलं आहे. या बैठकीनंतर डेमोक्रॅट प्रतिनिधी टिम रायन यांनी सांगितलं की, 'कॅपिटल हिल्सवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना गर्दीच्या विरोधात जास्त शक्तीचा वापर करण्याची परवानगी नव्हती. याच कारणामुळे जमावाने हिंसाचार केला आणि ऐतिहासिक इमारतीचे नुकसान केले.'

हे देखील वाचा - या 16 वर्षांच्या तरुणीनं फेरारी शर्यतीत रचला इतिहास

अनेक अधिकाऱ्यांना मानसिक धक्का - या घटनेनंतर अनेक अधिकाऱ्यांना मानसिक धक्का बसला आहे. कॅपिटॉल पोलिसांचे कार्यकारी प्रमुख योलान्डा पिटमॅन यांनी सांगितले की, 'कॅपिटल हिल्सवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना मानसिक धक्का बसला. या हिंसाचारामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह ५ पोलिसांचा मृत्यू झाला.'
First published:

Tags: Donald Trump, United States of America, USA

पुढील बातम्या