मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

शापाच्या भीतीने 2005 मध्ये चोरलेले प्राचीन अवशेष पाठवले परत, व्यक्त केली दिलगिरी

शापाच्या भीतीने 2005 मध्ये चोरलेले प्राचीन अवशेष पाठवले परत, व्यक्त केली दिलगिरी

एका पर्यटक महिलेने 2005 मध्ये इटलीतील जगप्रसिद्ध वासरा स्थळ असणाऱ्या पोंपेई येथून काही प्राचीन वस्तू चोरल्या होत्या. त्या वस्तुंमुळे कुटुंबाला शाप लागू नये या भीतीने तिने त्या वस्तु परत पाठवल्या आहेत आणि आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली आहे

पुढे वाचा ...
    इटली, 16 ऑक्टोबर: एका पर्यटक महिलेने 2005 मध्ये इटलीतील जगप्रसिद्ध पुरातत्व स्थळ असणाऱ्या पोंपेई येथून काही प्राचीन वस्तू चोरल्या होत्या. त्या वस्तुंमुळे कुटुंबाला शाप लागू नये या भीतीने तिने त्या वस्तु परत पाठवल्या आहेत आणि आपल्या कृत्याबद्दल माफीही मागितली आहे. कॅनडाच्या निकोल नामक महिलेने या वस्तू परत केल्या आहेत. यात फरशीचे दोन पांढरे तुकडे, अॅतम्फोरा या सुरईचे दोन तुकडे आणि भिंतीचा तुकडा या महिलेने पोंपेई येथील पुरातत्व पार्कला पाठविला आहे. तसेच तिच्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारी एक चिठ्ठी सोबत पाठवली. त्या महिलेने सांगितले की तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना या गोष्टीचा शाप लागू नये असे तिला वाटल्याने ती या वस्तू परत करत आहे. तिच्या माफीच्या पत्रात तिने असे म्हटले आहे की,  21 वर्षांची असताना पुरातन रोमन शहर पोंपोई येथे तिने भेट दिली होती. याठिकाणी तिने विकत घेता येणार नाही असा ऐतिहासिक वास्तूचे काही अवशेष चोरी केल्याचे तिने नमुद केले आहे.  निकोलने तरूणपणी असे केल्याचेही सांगितले. तिने असे म्हटले की, कॅनडाला परत आल्यापासून सलग 15 वर्षे दुर्दैव तिच्या हात धुवून मागे लागले आहे. तिला दोनवेळा स्तनांचा कर्करोग झाला असल्याचेही तिने म्हटले. ज्यामुळे डबल मॅस्टेक्टॉमी झाली आणि तिने आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत आणले असल्याचे तिने म्हटले आहे. (हे वाचा-सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव) तिने असे लिहिले आहे की, 'मी एका काळात चोरलेल्या अवशेषांमुळे माझ्याकडे नकारात्मक उर्जा ओढली गेली. ज्याठिकाणी लोकं इतक्या भयानक प्रकारे मारली गेली, त्याठिकाणची वस्तू मी चोरली आणि त्यामुळे त्याच नकारात्मकतेशी मी जोडले गेल.' 79 AD मध्ये माउंट व्हेसुव्हियसमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्याचा संदर्भ देऊन, तिने असे लिहिले आहे की, 'तेव्हा पोंपईतील लोक ज्वालामुखीच्या राखेखाली गाडले गेले होते.' पत्रात निकोलने देवाकडे क्षमा मागितली आहे. ती यात पुढे असे म्हणाली आहे की, ‘आम्ही चांगले लोक आहोत आणि मला हा शाप मला माझ्या कुटुंबात किंवा मुलांपर्यंत पोहोचू द्यायचा नाही आहे. या दुर्दैवातून मी मुक्त होण्याची आशा करते.' (हे वाचा-रिलायन्स JIO चा पोस्टपेड प्लस प्लॅन, 300 जीबी डेटासह मोफत मिळतील या सेवा) यात दुसऱ्या कॅनेडियन जोडप्याचे एक पत्र देखील होते ज्यांनी त्याच प्रवासादरम्यान काही कलाकृती चोरी केल्या होत्या. त्याबाबतही याबरोबरच माफीनामा पत्र आले आहे. 'व्हेसुव्हियसचा उद्रेक आणि त्यांवेळी लोकांच्या झालेल्या भयंकर मृत्यूमधील वेदनांचा विचार न करता आम्ही ते भाग चोरले’,असे त्यांनी माफीनाम्यात लिहिलेले आहे. त्यांनी यात दिलगिरी व्यक्त केली आहे आणि क्षमा मागितली आहे. पोंपेई येथील पुरातत्व उद्यानाच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांत त्यांना शेकडो अशा लहान कलाकृती परत मिळाल्या ज्या पोंपेईला भेट देणाऱ्या अनेकांनी चोरल्या होत्या.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या