Home /News /videsh /

Walkवर गेलेल्या महिलेच्या छातीत लागली गोळी, ब्रेस्ट इम्प्लांटनं असं दिलं जीवनदान

Walkवर गेलेल्या महिलेच्या छातीत लागली गोळी, ब्रेस्ट इम्प्लांटनं असं दिलं जीवनदान

कधीकाळी फॅशन म्हणून वापरल्या जाणाऱ्या ब्रेस्‍ट इम्प्लांटमुळे चक्क एका महिलेचे प्राण वाचले.

    टोराँटो, 23 एप्रिल : दरवर्षी जगातील 2 ते 3 लाख महिला ब्रेस्‍ट इम्प्लांट (Breast Implants) करतात. अर्थात त्याचे भयानक दुष्परिणाम आहेत, तरीही पाश्चात्य देशांमध्ये त्याचे अभिसरण वाढत आहे. मात्र, कॅनडाच्या टोराँटो शहरात राहणा-या महिलेसाठी हेच ब्रेस्‍ट इम्प्लांट जीवनदान ठरले आहे. ब्रेस्‍ट इम्प्लांटमुळे या महिलेचे प्राण वाचले. कॅनडामधील या 30 वर्षीय महिलेला एका घटनेमध्ये अगदी जवळून गोळी लागली होती. ही गोळी महिलेच्या डाव्या स्तनात अडकली, ज्यामुळे आत संसर्ग झाला होता. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तिच्या छातीतून सतत रक्तस्त्राव होत होता. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी ब्रेस्ट इम्प्लांटचा सल्ला दिला होता. वाचा-'भारतात जन्म ही माझी चूक', ट्रम्प यांच्या इमिग्रेशनच्या घोषणेवर भारतीय नाराज डॉक्टरांनी ब्रेस्‍ट इम्प्लांट केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेवर सिलिकॉन कव्हर लावले. ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांनी त्याच्या स्तनातून 0.40 कॅलिबरची बुलेट काढली. ही 2018ची घटना आहे, परंतु नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून हे प्रकरण समोर आले आहे. वाचा-निरोगी रुग्णांमध्ये 70 दिवसांनी दिसली वेगळीच लक्षणं, वैज्ञानिकांची चिंता वाढली SAGE या मेडिकल जर्नलने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की छातीत गोळी ब्रेस्‍ट इम्प्लांट केल्यानंतर जीवंत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण फार कमी आहे. ही केस स्टडी लिहिणारे सर्जन जियानकार्लो मॅकेव्हिन म्हणतात, “गोळी महिलेच्या डाव्या बाजुला लागली आणि स्टर्नम फाडून उजव्या स्तनापर्यंत पोहोचली. अशा परिस्थितीत, ब्रेस्‍ट इम्प्लांट हा एकमेव मार्ग होता ज्याद्वारे महिलेचे प्राण वाचू शकले". ते असेही म्हणाले, "जर गोळी थेट लागली तर धोका अधिक असला असता. कदाचित महिलेचा मृत्यू असता". दरम्यान या महिलेची प्रकृती आता ठिक असून, जगभरातून सध्या या महिलेची चर्चा आहे. वाचा-खरं आहे की खोटं : 3 मेपर्यंत टेलिकॉम कंपनी इंटरनेट फ्री देणार? संपादन, संकलन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या