व्हिक्टोरिया, 18 फेब्रुवारी : आपल्या आसपासचं जग अनेक आश्चर्यांनी भरलेलं आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. माणसांसह वस्तूंबाबतही अनेक चित्रविचित्र अनुभव प्रत्येकाला येत असतात. अशीच एक गोष्ट घडली आहे एका आयफोनच्या (i phone) बाबतीत.
एक आयफोन पाण्यात पडला. विशेष म्हणजे पूर्ण रात्र तो तिथंच पडून राहिला (overnight). मात्र त्याला काहीच झालं नाही (undamaged). ही घटना आहे कॅनडा इथल्या व्हिक्टोरियाची (Victoriya city of Cananda). या ठिकाणी राहणारे रोमन हे गृहस्थ (Man named Roman) व्हॅलेंटाईन डेला (Valentine Day) म्हणजे 14 फेब्रुवारीला रात्री पुलावर (on bridge) उभं राहून फोटो (photo) काढून घेत होते. अचानक त्यांच्या हातातून फोन पडला.
हा फोन काही साधासुधा फोन नव्हता. तो होता iphone XS. आता मोठंच संकट आलं. काळोख्या रात्री पाण्यात जाऊन फोन शोधणं काही शक्य नव्हतं. रोमन अस्वस्थ होत घरी परतले. एका स्थानिक वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, रोमन यांना आता फोन परत मिळेल आणि तो चांगल्या स्थितीत असेल याची अजिबात आशा नव्हती. मात्र तरीही रोमन दुसऱ्या दिवशी त्याच पुलावर गेले. त्यांनी आपला आयफोन परत मिळवायला उडी मारली. रोमन यांचं नशीब चांगलं होतं. जमलेल्या पाण्यात काही वेळ शोधाशोध केल्यावर लगेचच त्यांना फोन सापडला.
हेही वाचाऐकावं ते नवलच! म्हणे, 'हवेनं मला प्रेग्नंट केलं आणि 15 मिनिटांत हलला पाळणा'
रोमन यांचं नशीब खरोखर चांगलं होतं असं म्हणावं लागेल. काही महिन्यांपूर्वी वॉटरप्रूफ असल्याचा दावा करण्याबाबत अॅपलच्या फोनला (Apple phone) कोट्यवधींचा दंड भरावा लागला आहे. इटलीची अँटी-ट्रस्ट ऑथॉरिटी ACGM नं apple वर 10 मिलियन युरो (जवळपास 10 मिलियन डॉलर्स) इतका दंड लावला. या दंड या कंपनीनं वॉटर रेजिस्टंट्स क्षमतेबाबत (water resistance capacity) केलेल्या खोट्या दाव्यांमुळं लावण्यात आला होता. Apple नं केलेल्या दाव्यांवर टीका करताना ACGM नं म्हटलं होतं, की apple चे दावे केवळ काही विशिष्ट परिस्थितीतच खरे आहेत. apple चा दावा आहे, की त्याचे विविध आयफोन मॉडेल्स चार मीटरच्या खोलीपर्यंत 30 मिनिटांपर्यंत वॉटरप्रूफ आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.