रुग्णसेवा हेच आमचं कर्तव्य! कोरोना रुग्णांसाठी शीख डॉक्टरांनी केली दाढी

रुग्णसेवा हेच आमचं कर्तव्य! कोरोना रुग्णांसाठी शीख डॉक्टरांनी केली दाढी

कोरोना रुग्णांवर उपचार करताना मास्क घालणं गरजेचं आहे. त्यामुळे कॅनडातील शीख डॉक्टरांनी दाढी (sikh doctors beard) कापण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

टोरंटो, 06 मे : रुग्णसेवा हेच आपलं पहिलं कर्तव्य हे दाखवून दिलं आहे, कॅनडातील शीख डॉक्टरांनी (sikh doctor). कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 2 शीख डॉक्टरांनी दाढी (beard) करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना मास्क घालणं गरजेचं आहे आणि दाढीमुळे मास्क चेहऱ्यावर नीट बसत नाही. त्यामुळे या दोन्ही डॉक्टर भावांनी शीख धर्माच्या आस्थेचं प्रतीक मानली जाणारी दाढी काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार माँट्रियलमध्ये राहणारे फिजिशिअन संजीत सिंह सलूजा आणि त्यांचे न्यूरोसर्जन भाऊ रंजीत सिंह यांनी धार्मिक सल्लागार, कुटुंब आणि मित्रांचा सल्ला घेतल्यानंतर दाढी कापण्याचा निर्णय घेतला. हे दोघंही मॅक्गिल युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सेंटरमध्ये कार्यरत आहेत.

हे वाचा - चीनचं करायचं काय? लस तयार करण्यासाठी वादग्रस्त कंपन्यांना दिली परवानगी कारण...

मॅक्गिल युनिव्हर्सिटीच्या हेल्थ सेंटर (एमयूएचसी) ने दिलेल्या माहितीनुसार, "शीख असल्यानं दाढी ठेवणं हा त्यांच्या संस्कृती एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र त्यामुळे त्यांना मास्क घालण्यात समस्या येत होती. त्यामुळे खूप विचारपूर्वक त्यांनी आता आपली दाढी कापण्याचा निर्णय घेतला आहे"

एमयूएचसीमध्ये न्यूरोसर्जन म्हणून काम करणारे रंजीत यांनी एमयूएचसीच्या वेबसाईटवर एका व्हिडिओ संदेशमार्फत सांगितलं की, "दाढीमुळे आम्ही काम न करण्याचा पर्याय निवडू शकलो असतो. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास नकार देऊ शकलो असतो मात्र ते डॉक्टर म्हणून घेतलेली शपथ आणि सिद्धांताविरोधात असतं"

हे वाचा - कोरोनाव्हायरसविरोधातील लसीचं ह्युमन ट्रायल सुरू, आता परिणामांची प्रतीक्षा

तर डॉ. सलूजा म्हणाले, हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठिण होतं, मात्र सध्याची परिस्थिती पाहता असा निर्णय घेणं गरजेचं होतं. त्यांचा हवाला देत माँट्रियल गॅजेटने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयामुळे मी निराश झालो, कारण ती माझी ओळख होती. आता मी खूप वेगळा दिसतो. जेव्हा जेव्हा माझा चेहरा पाहतो, तेव्हा मला धक्काच बसतो.

ब्रिटनमधील शीख डॉक्टरांना दाढीमुळे ड्युटीवरून हटवलं

ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरस रुग्णांची सेवा करण्यासाठी पुढे असलेल्या शीख डॉक्टरांना दाढीच्या कारणामुळे ड्युटीवरून हटवण्यात आलं आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (NHS) काम करणारे हे डॉक्टर कोरोनाव्हायरस रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावत होते, मात्र आता त्यांना कोरोनाव्हायरस वॉर्डची ड्युटी लावली जात नाही आहे. ज्याला या डॉक्टरांनी विरोध केला आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शीख डॉक्टरांना दाढी असल्याने त्यांना त्यांच्या सामान्य शिफ्ट ड्युटीतून काढण्यात आलं आहे. ब्रिटनच्या शीख डॉक्टर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 5 डॉक्टरांना त्यांच्या दाढीमुळे कोरोनावायरस वॉर्डमध्ये ड्युटी करण्यापासून रोखण्यात आलं आहे.

हे वाचा - ब्रिटनमध्ये दाढी असलेल्या डॉक्टरांना का करू दिली जात नाहीये रुग्णसेवा?

दाढीमुळे फेस मास्क चेहऱ्याला नीट कव्हर करू शकत नाही, अशात संक्रमणाचा धोका वाढतो. जर स्टाफ दाढी करणार नाहीत तर त्यांना वेगळ्या प्रकारची मेडिकल शिफ्ट लावली जाते. त्यांना नॉन क्लिनिकल विभागात काम मिळू शकतं, मात्र रुग्णांच्या वॉर्डपासून त्यांना दूर ठेवलं जातं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 6, 2020, 9:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या