Vaccine Diplomacy: भारताची मदत मिळताच शेतकरी आंदोलनावर कॅनडाची बदलली भाषा

Vaccine Diplomacy: भारताची मदत मिळताच शेतकरी आंदोलनावर कॅनडाची बदलली भाषा

भारतामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) पाठिंबा देणाऱ्या कॅनडाची भाषा आता बदलू लागली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी डिसेंबर महिन्यात या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी : भारतामध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) पाठिंबा देणाऱ्या कॅनडाची भाषा आता बदलू लागली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी डिसेंबर महिन्यात या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता त्यांनी या प्रश्नावर भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा देण्याचंही ट्रुडो यांनी मान्य केलं असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.

का बदलली भाषा?

यापूर्वी कॅनडानं कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine) बाबत भारताची मदत मागितली होती. त्यावर भारतानं या विषयावर सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वसन दिलं होतं. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी याबाबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन दिली होती. त्याचबरोबर हवामानातील बदल (Climate Change) आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुधारणेच्या मुद्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले होते. भारतानं तातडीनं मदतीचं आश्वासन दिल्यानंतरच कॅनडाची या विषयावर भाषा बदलल्याचं मानलं जात आहे.

( वाचा :  20 देशांसाठी भारताचं कोरोना व्हॅक्सिन ठरतंय संजीवनी, 2.29 कोटी लशीचे डोस पाठवले )

पंतप्रधान कार्यालयानं (PMO) यापूर्वी एक अधिकृत वक्तव्य दिलं होतं. यामध्ये जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदी यांना कॅनडातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली तसंच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कॅनडाला कोरोना व्हॅक्सिनची आवश्यकता असल्याचं सांगितल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अन्य देशांप्रमाणे कॅनडालाही सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं.

जस्टीन ट्रुडो यांनीही एक ट्विट करुन पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेवर समाधान व्यक्त केलं होत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझी अनेक मुद्यांवर चांगली चर्चा झाली. आम्ही यापुढंही संपर्कात राहण्याचं ठरवलं आहे.’ असं ट्रुडो यांनी या ट्वीटमध्ये म्हंटलं होतं.

Published by: News18 Desk
First published: February 13, 2021, 11:46 AM IST

ताज्या बातम्या