देशात दहशतवादी आहेत का? पाकिस्तानच्या माजी NSAचं हे आहे धक्कादायक उत्तर

देशात दहशतवादी आहेत का? पाकिस्तानच्या माजी NSAचं हे आहे धक्कादायक उत्तर

देशातील परिस्थिती अस्वस्थ करते असं विधान पाकचे माजी NSA प्रमुख दुर्रांनी यांनी केलं आहे.

  • Share this:

दिल्ली, 22 फेब्रुवारी : पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पाकनं मात्र आमचा हल्ल्याशी काहीही संबंध नाही असं म्हणत हात वर केले आहेत. पण, पाकिस्तानची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. कारण, देशातील दहशतवाद्यांचं अस्तित्व नाकारता देखील येत नाही आणि स्वीकारता देखील येत नाही असं सूचक विधान पाकचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमुद अली दुर्रांनी यांनी केलं आहे. 'न्यूज18'ला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी दहशतवादाबद्दल हे विधान केले आहे. दुर्रांनी यांच्या या विधानामुळे दहशतवादावर पाकिस्तानची नेमकी भूमिका काय? दहशतवादाचा मुद्दा हा पाकिस्तानच्या अवघड जागेवरील दुखणं झालं आहे का? असा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे.

मुंबईवर 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी महमुद अली दुर्रानी हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी होते. सध्या दोन्ही देशांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांवर देखील दुर्रानी यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

मध्यस्तीची मदत घ्या

दरम्यान, भारत आणि पाकिस्ताननं आता तिसऱ्या पक्षाची मदत घ्यावी आणि परिस्थितीवर तोडगा काढावा. तो दिवस नक्की येईल. पण, त्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धाची घोषणा होणार नाही हीच अपेक्षा असं मत यावेळी दुर्रानी यांनी मांडलं आहे.

मुंबई हल्ल्याबद्दल काय बोलले दुर्रांनी

यावेळी दुर्रांनी यांनी 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यावर देखील भाष्य केलं. मुंबईमध्ये झालेला हल्ला हा पाकिस्तानातील दहशतवादी गटाकडून झाला ही बाब खरी आहे. पण, त्यामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेचा कोणताही हात नव्हता असं दुर्रानी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुरावे देताना भारतानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप दुर्रांनी यांनी केला आहे. सुरूवातीला पुरावे अपुरे आणि मराठी भाषेत दिले गेले. मराठीतील पुरावे समजून घेणं कठीण होतं. त्यानंतर या प्रकरणामध्ये भारतानं काहीही पावलं उचलली नाहीत असं देखील दुर्रांनी यांनी म्हटलं आहे.

तर, 2016मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर देखील पुरावे न दिल्यानं कारवाई करणं पाकिस्तानला कठिण गेलं होतं असं देखील दुर्रांनी यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानकडे बोट का?

भारतीय सैन्यावर होणारे हल्ले ही बाब समर्थनीय नाही. पण, काश्मीरमध्ये काहीही झालं की पाकिस्तानकडे बोट दाखवण्यापूर्वी भारतानं स्वत:कडे देखील पाहणं गरजेचं आहे अशा शब्दात दुर्रांनी यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. आम्हाला परिस्थितीमध्ये सुधारणा करायची आहे म्हणूनच आम्ही पुरावे मागतो. पण, यामध्ये खोडा घालणारे पाकिस्तानचे मित्र नाहीत ही बाब देखील भारतानं ध्यानात घ्यावी, असं मत यावेळी दुर्रांनी यांनी मांडलं आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तानला दोष देणं थांबवलं पाहिजे असं देखील दुर्रांनी यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

चोराच्या उलट्या बोंबा

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांना गंभीर असा इशारा दिला आहे. पण, त्यानंतर पाकिस्तान देखील शांत बसणार नाही अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान केली आहे.

Special Report : शिवसेना की राष्ट्रवादी, कोण होणार ठाण्याचा ठाणेदार?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 07:08 PM IST

ताज्या बातम्या