Home /News /videsh /

'या' तरुणीने 6 वर्षांपासून बंद केलाय Shampoo चा वापर, केस धुण्यासाठी वापरते फक्त पाणी!

'या' तरुणीने 6 वर्षांपासून बंद केलाय Shampoo चा वापर, केस धुण्यासाठी वापरते फक्त पाणी!

गेल्या सहा वर्षांपासून तिने केस धुण्यासाठी शाम्पूचा (No Shampoo for hair from last 6 years) वापर केलेला नाही. यामुळे माझे केस खूपच चांगले आणि पूर्वीपेक्षा अधिक निरोगी झाले असल्याचा दावा तिने केला आहे.

कॅलिफोर्निया, 20 फेब्रुवारी: अनेकदा लोक त्यांच्या केसांसाठी (Hair care) आणि त्वचेच्या (Skin care) आरोग्यासाठी योग्य प्रोडक्टची  निवड करताना गोंधळून जातात. मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) येथे राहणाऱ्या एका मुलीने या सर्व गोंधळ आणि त्रासाला पूर्णविराम दिला आहे. गेल्या सहा वर्षांपासून तिने केस धुण्यासाठी शाम्पूचा (No Shampoo for hair from last 6 years) वापर केलेला नाही. यामुळे माझे केस खूपच चांगले आणि पूर्वीपेक्षा अधिक निरोगी झाले असल्याचा दावा तिने केला आहे. कॅलिफोर्नियातल्या रिव्हरसाईड येथे राहणाऱ्या 27 वर्षांची लॉरा अ‍ॅशले (Laura Ashley) व्हेगन असून ती प्राण्यांशी संबंधित कोणतीही उत्पादनं वापरत नाही. ती No Poo या चळवळीची सदस्य असून, याच कारणामुळे तिनं केसांसाठी शाम्पू वापरणं बंद केलं आहे. आता लॉराचे केस नैसर्गिकरित्या लांब आणि कुरळे झाले असून, लोकं तिच्या केसांचं कौतुक करत आहेत. 'मी कमर्शिअल शाम्पू वापरणं बंद केलं. हेच माझ्या लांब केसांचं रहस्य आहे', असे ती सांगते. हे वाचा-Shocking! दारूची बाटली दिसताच ढोसली; ड्रिंक करताच कोमात गेली व्यक्ती शाम्पूविना केस कसे स्वच्छ करते? याबाबत लॉरा म्हणते की, 'काही वर्षांपूर्वी मी जे लोक शाम्पू वापरत नाहीत, त्यांच्याविषयी इंटरनेटवर वाचले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी बाजारातील शाम्पू वापरणं बंद केलं'. डेली मेलच्या वृत्तानुसार, ती स्वतः अनेक पदार्थ एकत्र करून केसांना लावत असे आणि त्यामुळे आता तिचे केस पूर्वीपेक्षा अधिक निरोगी झाले आहे. केसांना खरंच बाजारातील उत्पादनांची गरज असते का, हे पाहणं हा एक प्रकारचा प्रयोग होता. जेव्हा तिनं शाम्पू लावणं बंद केलं तेव्हा तिचे केस लवकर वाढले आणि निरोगी झाले. काही दिवस तिनं केस धुण्यासाठी सोडा (Soda) आणि व्हिनेगरचा वापर केला, परंतु, त्याचाही फारसा फायदा झाला नाही. शेवटी, तिनं केस फक्त पाण्याने धुवून, त्याला नंतर थोडं तेल लावण्यास सुरुवात केली. हे वाचा-याठिकाणी WhatsApp वर अशी इमोजी पाठवली तर थेट तुरुंगवारी! होऊ शकतो 20 लाखांचा दंड अन्नाचा केसांशी संबंध शॉम्पूचा वापर न करणारी लॉरा सांगते की, 'केस शाम्पूमुळे नाही तर खाण्यापिण्याच्या सवयीमुळे तेलकट होतात किंवा गळतात. शाम्पूचा वापर बंद केल्यानंतर एक-दोन महिने मला त्रास जाणवला, पण आता माझे केस चांगले झाले आहेत'. ती अर्थात प्युअर व्हेगन आहे. तिच्या आहारात प्रामुख्याने कच्च्या भाज्यांचा समावेश असतो. आहारात फळे, भाजीपाल्याचा समावेश अधिक असतो. सोशल मीडियावरील बऱ्याच लोकांना तिचं हेअर रुटिन (Hair Routine) आवडत नसल्याचं दिसतं. परंतु, लॉराला यामुळे त्रास होत नाही. शाम्पूशिवाय केस स्वच्छ होत नाहीत किंवा त्यांना दुर्गंधी येते, असं अनेक लोकांना वाटतं. पण लॉरा अशा लोकांचं म्हणणं खोटं ठरवते.
First published:

Tags: Viral news, Woman hair

पुढील बातम्या