आता कोरोना व्हायरस नाकाच्या बाहेरच येऊ शकणार नाही, शास्रज्ञांनी तयार केला स्प्रे

आता कोरोना व्हायरस नाकाच्या बाहेरच येऊ शकणार नाही, शास्रज्ञांनी तयार केला स्प्रे

संशोधकांनी या स्प्रेचा वापर करून त्याचं परिक्षणही केलं आहे. त्यात चांगले परिणाम आल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क 14 ऑगस्ट: कोरोना व्हायरसवर औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरु आहे. मात्र त्याला अजुनही पाहिजे तसं यश आलेलं नाही. त्यात मोठी प्रगती झालेली आहे. पण पूर्ण यश मिळायला आणखी काही वर्ष महिने जातील असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रचार रोखण्यासाठी शास्रज्ञांनी काही गोष्टी शोधून काढण्यात यश मिळवलं आहे. कॉलिफोर्निया विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी एका खास स्प्रेची निर्मिती केली असून तो स्प्रे नाकात मारल्यानंतर व्हायरस बाहेर येऊ शकणार नाही असा दावा शास्रज्ञांनी केला आहे.

कोरोनावर रामबाण औषध निघालेलं नाही त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक संशोधनाचा उपयोग होत असल्याचं मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. कोरोना व्हायरसला रोखणाऱ्या Antibody’sपासून हा स्प्रे तयार करण्यात आला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या किंवा संशयीत रुग्णांमुळे व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते.

नाकातून आणि तोंडावाटे बाहेर येणाऱ्या तुषारांमध्ये या व्हायरसचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हा स्प्रे नाकात केल्यानंतर व्हायरस सॅनिटाइज होते असा दावा शास्रज्ज्ञांनी केला आहे.

'...तर या लसीमुळे दोन वर्ष लोकं राहणार कोरोनामुक्त', रशियाचा दावा

संशोधकांनी या स्प्रेचा वापर करून त्याचं परिक्षणही केलं आहे. त्यात चांगले परिणाम आल्याचं समोर आलं आहे. या स्प्रेचा वापर केला तर व्हायरसचा प्रसार रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा केला गेले आहे. इनहेलर सारखा वापरही त्याचा होऊ शकतो. सिंथेटीक पदार्थापासून हा स्प्रे तयार करण्यात आला असून तो वापरण्यासही सोपा असल्याचा दावा केला गेला आहे.

Covaxin ची पहिली ट्रायल यशस्वी, नागपूरातील रुग्णांवर असा दिसला परिणाम

जगात अमेरिकेत सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण असून संख्या दररोज वाढत आहे. तर रुग्णांच्या मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचे परिणाम जाहीर झालेले आहेत. त्यांनी तयार केलेल्या लशीच्या परिक्षणाचा दुसरा टप्पा आता सुरु झाला असून जगभरातल्या शास्रज्ञांच्या आशा वाढल्या आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या