मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Birthday ठरला अखेरचा, मेक्सिकोत ड्रग्ज माफियांच्या गोळीबारात भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगरची हत्या

Birthday ठरला अखेरचा, मेक्सिकोत ड्रग्ज माफियांच्या गोळीबारात भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगरची हत्या

गोळीबारात हिमाचल प्रदेशातील 29 वर्षीय अंजली रयोतचा (Anjali Ryot)मृत्यू झाला आहे.

गोळीबारात हिमाचल प्रदेशातील 29 वर्षीय अंजली रयोतचा (Anjali Ryot)मृत्यू झाला आहे.

गोळीबारात हिमाचल प्रदेशातील 29 वर्षीय अंजली रयोतचा (Anjali Ryot)मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मेक्सिको, 24 ऑक्टोबर: मेक्सिकोच्या (Mexico)कॅरेबियन किनार्‍यावर दोन ड्रग्ज माफियांच्या गँगमध्ये झालेल्या गोळीबारात हिमाचल प्रदेशातील 29 वर्षीय अंजली रयोतचा (Anjali Ryot)मृत्यू झाला आहे. ती तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेक्सिकोला गेली होती. ती सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहतं होती. ही बातमी कळताच अंजलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अंजली स्वतः वाढदिवस साजरा करण्यासाठी मेक्सिकोला गेली होती. अंजली व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनीअर तसेच उत्तम ट्रॅव्हल ब्लॉगर होती. हेही वाचा- किरण गोसावीच्या बॉडीगार्डचा खळबळजनक दावा, शाहरुखकडे केली होती 25 कोटींची मागणी अंजलीचे वडील केडी रयोत यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, ती आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणं आमच्यासाठी खूप कठीण आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव झाल्यानंतर गेल्या वर्षी अंजलीनं सोलनमध्ये त्याच्यासोबत तीन-चार महिने घालवले होते. केडी रयोत यांनी सांगितलं की, अंजलीचा 30 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंजली आणि तिचे पती उत्कर्ष श्रीवास्तव 22 ऑक्टोबर रोजी कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस येथे गेले होते. हेही वाचा-  India vs Pakistan: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी धोनीला मिळाली खराब खेळण्याची ऑफर! VIDEO शिकागो येथे राहणारा अंजलीचा लहान भाऊ आशिष याला उत्कर्षनं सांगितलं की, टुलुम कॅरिबियन रिसॉर्टमध्ये रात्रीचे जेवण केल्यानंतर दुकानातून आईस्क्रीम घेतल्यानंतर लगेचच तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आशिषनं 21 ऑक्टोबर रोजी वडिलांना फोन करून हा प्रकार सांगितला. या गोळीबारात एका जर्मन महिलेचाही मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेश पशुसंवर्धन विभागाचे माजी संचालक के डी रयोत आणि त्यांची पत्नी निर्मला रयोत यांनी म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ती तीन-चार महिने सोलनमध्ये त्याच्यासोबत राहिली होती. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित डिप्लोमा करण्यासाठी अंजली कॅलिफोर्नियाहून मुंबईत आली होती. लॉकडाऊन लागल्यानं ती कोर्स पूर्ण केल्यानंतर लगेच ती आम्हाला भेटायला आली होती. बीटेक पूर्ण केल्यानंतर, अंजली सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी 2012 मध्ये कॅलिफोर्नियाला गेली. अंजलीनं आपल्या फेसबूक अकाऊंटवर लिहिलं आहे की, तिनं सोलन येथील सेंट ल्यूक धर्मशाला येथील सेक्रेड हार्ट हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. हेही वाचा- Video: आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान केंद्रावर घोळ, पुणे नाशिकमध्ये गोंधळ वडिलांनी सांगितलं की, अंजली या वर्षी जुलैपासून लिंक्डइनमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होती. याआधी 2014 ते 2019 पर्यंत तिने याहूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं होतं. पुढे त्यांनी सांगितलं की, तिला प्रवासाची आवड होती. ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर देखील होती. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सोलन येथे आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितले. अंजलीचे पती उत्कर्ष, जो मूळचा मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे, तो सध्या नेटफ्लिक्समध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतो.
First published:

Tags: Drug case

पुढील बातम्या