Home /News /videsh /

पाकिस्तानातील कॅफे मालकिणीला मॅनेजरच्या इंग्रजी भाषेची चेष्टा करणं पडलं महागात; नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

पाकिस्तानातील कॅफे मालकिणीला मॅनेजरच्या इंग्रजी भाषेची चेष्टा करणं पडलं महागात; नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानातील एका कॅफे मालकीनीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये ही मालकीन तिच्या कॅफेतील एका मॅनेजरच्या इंग्रजी भाषेची खिल्ली उडवताना दिसत आहे.

  इस्लामाबाद, 22 जानेवारी: सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानातील एका कॅफे मालकीनीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये ही मालकीन तिच्या कॅफेतील एका मॅनेजरच्या इंग्रजी भाषेची खिल्ली उडवताना दिसत आहे. ज्यामध्ये हा कॅफे मॅनेजर इंग्रजी भाषा बोलताना स्पष्टपणे अडखळताना दिसत आहे. 1 मिनीटे 18 सेंकदाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत. आता नेटकऱ्यांनी कॅफे मालकीनीला झाप झाप झापायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओमधील या महिलांची नावं उझमा आणि दिया असं असून त्या इस्लामाबादमधील कन्नोली कॅफे सोलच्या मालक आहेत. या महिलांनी त्यांच्या कॅफेत नऊ वर्ष मॅनेजर पदावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला इंग्रजी भाषेत स्वत: चा परिचय देण्यास सांगितलं आहे. पण संबंधित मॅनेजरला इंग्रजी भाषा बोलता येत नसल्याने तो इंग्रजी भाषा बोलण्याचा कसाबसा प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रकरणावरून आता चांगलाच वादंग पेटलेला पाहायला मिळत आहे. परिणामी #BoycottCannoli हा ट्वीटर ट्रेन्ड देखील पाकिस्तानमध्ये अव्वल स्थानी सुरू होता. या व्हिडिओमध्ये, उझमा आणि दिया यांनी सांगितलं की, त्यांचा मॅनेजर अवैस त्यांच्याबरोबर गेल्या नऊ वर्षांपासून काम करीत आहे. " त्यानंतर 'इंग्रजी शिकवण्यासाठी तुम्ही किती वर्ष घालवले आहेत?" असा प्रश्न दीया विचारते. यावर उत्तर देताना अवैस म्हणतो की, दीड वर्षांच्या कालावधीत तीन इंग्रजी कोर्स शिकलो आहे. त्यानंतर उझमाने त्याला सर्वासोबत इंग्रजी भाषेत बोलण्यासाठी घाट घातला. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, या दोन महिला मॅनेजरच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीवर हसताना दिसत आहे. यातील रझा अहमद रुमी यांनी हा व्हिडिओ ट्वीट करताना म्हटलं की, 'हे खूप दुःखद आहे. क्लास प्रिव्हिलेज्ड, वसाहतवादी हँगओव्हर आणि पाकिस्तानी अभिजात वर्गाची नीतिभ्रष्टता - हे सर्व एकाच क्लिपमध्ये आणलं आहे. या व्हिडिओतील नायक हा  मॅनेजर आहे. त्याच्या कठोर परिश्रमाला, समर्पणाला आणि सहनशीलतेला माझा सलाम आहे!' हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत हा व्हिडिओ 9 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. यावेळी यातील एक महिलेनं टोमणा मारण्याच्या आविर्भावात म्हटलं की, हा खुप चांगलं इंग्रजी बोलू शकतो, त्यासाठी आम्ही याला पगार देतो. हा व्हिडिओ काही मिनीटांतच प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी कॅफेच्या मालकीनींवर तोंडसुख घेतलं आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
  त्यांच्या टीकेची झोड उठल्यानंतर या कॅफेच्या मालकीनीने अधिकृत पोस्ट लिहून माफी मागितली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कोणालाही दुखवायचा आमचा हेतू नव्हता. आम्हाला पाकिस्तानी असल्याचा अभिमान असून आमचं पाकिस्तानी भाषा आणि संस्कृतीवर आमचं प्रेम आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Pakistan, Viral videos

  पुढील बातम्या