मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Adult Site वरुन यूट्यूबरने कमावले 7 कोटी 43 लाख, तेही 48 तासात! एका फोटोच्या बदल्यात मिळाले 1 कोटी

Adult Site वरुन यूट्यूबरने कमावले 7 कोटी 43 लाख, तेही 48 तासात! एका फोटोच्या बदल्यात मिळाले 1 कोटी

कोरीना कॉफ (Corinna Kopf) असं तिचं नाव असून ती एक यूट्यूबर (You Tuber) आहे. ओन्ली फॅन्स (only Fans) या अडल्ट साईटवर (Adult Site) केवळ फोटो पोस्ट करुन आपण कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा दावा तिनं केला आहे.

कोरीना कॉफ (Corinna Kopf) असं तिचं नाव असून ती एक यूट्यूबर (You Tuber) आहे. ओन्ली फॅन्स (only Fans) या अडल्ट साईटवर (Adult Site) केवळ फोटो पोस्ट करुन आपण कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा दावा तिनं केला आहे.

कोरीना कॉफ (Corinna Kopf) असं तिचं नाव असून ती एक यूट्यूबर (You Tuber) आहे. ओन्ली फॅन्स (only Fans) या अडल्ट साईटवर (Adult Site) केवळ फोटो पोस्ट करुन आपण कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा दावा तिनं केला आहे.

  जगभरात गेल्या दीड वर्षापासून पसरलेल्या कोविड -19च्या साथीमुळे (Covid-19 Pandemic) असंख्य लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत किंवा त्यांना नुकसान सोसावं लागत आहे. त्यामुळं अनेकजण रोजीरोटीसाठी काही नां काही मार्ग शोधत आहेत. अशावेळी काही कल्पक व्यक्ती भन्नाट आयडिया लढवून लाखोंची कमाई करत आहेत. अशीच एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

  कोरीना कॉफ (Corinna Kopf) असं तिचं नाव असून ती एक यूट्यूबर (You Tuber) आहे. ओन्ली फॅन्स (only Fans) या अडल्ट साईटवर (Adult Site) केवळ फोटो पोस्ट करुन आपण कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा दावा तिनं केला आहे. यामुळे सगळीकडे खळबळ माजली असून, तिचीच चर्चा सुरू आहे.

  कोरीना व्यवसायानं एक मॉडेल आहे. गेल्याच महिन्यात तिनं आपलं ओन्ली फॅन्स प्रोफाइल (Only Fans Profile) दाखल केले होते. या साईटवर फोटो टाकून तिनं कोट्यवधींची कमाई केली आहे. ओन्ली फॅन्स हा सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅटफॉर्म असून इथं तुमच्या फॅनबेसवरून तुम्हाला थेट पेमेंट मिळतं.

  हे वाचा-'तू खरंच प्रेम केलं का'? युवकानं GF सोबत केलेलं कृत्य पाहून न्यायाधीशही हैराण

  स्वतःच सांगितली आपली कमाई

  कोरिनानं स्वतःच आपल्या कमाईविषयी माहिती दिली आहे. यूट्यूबवरील आपल्या ब्लॉगवर तिनं ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच तिनं ओन्ली फॅन्सवर आपलं प्रोफाइल तयार केलं असून, 48 तासात आपण दहा लाख डॉलर्सपेक्षा (Makes Millions Dollars in 48 Hours) जास्त कमाई केली असल्याचं तिनं म्हटलं आहे. या कमाईतून तिनं नवीकोरी फेरारीही (Ferrari) घेतली असल्याचं तिनं सांगितलं. मात्र एका महिन्यात तिची कमाई किती होते असं विचारलं असता तिनं याबाबत काही सांगण्यास नकार दिला.

  हे वाचा-‘ड्रेसचा गळा 'डीप' शिवायचाय; पण...' पाकिस्तानी सोशल मीडियावर काय सुरू आहे चर्चा

  एका फोटोला मिळाले एक कोटी

  कोरीना कॉफ तिची महिन्याची कमाई जाहीर करण्यास उत्सुक नव्हती, मात्र फक्त एका फोटोमधून (Photo) आपण तब्बल 142000 पौंड म्हणजे 1 कोटीची कमाई केली असल्याचं तिनं सांगितलं. हा फोटो खूप खास होता, असंही तिनं म्हटलं आहे. तिच्या चित्रांचा काहीजण गैरवापर करत असल्यानं नुकसान झाल्याचंही तिनं सांगितलं आहे. चाहत्यांसाठी टाकलेला सर्वच कंटेंट त्यांना आवडलाच पाहिजे असा आपला आग्रह नसल्याचंही कोरीनानं स्पष्ट केलं आहे. चाहत्यांनी तिला दिलेल्या उंदड प्रेमाबद्दल तिनंही त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केलं आहे. कोरीनाच्या या कमाईनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, सर्वजण तिचं अभिनंदन तसंच कौतुक करत आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Photo viral, Youtube, Youtubers