मृत्यूनंतर 2 महिन्यांनी बौद्ध भिक्खुचे पार्थिव काढले बाहेर, ते पाहून अवघे जग झाले अवाक्!

मृत्यूनंतर 2 महिन्यांनी बौद्ध भिक्खुचे पार्थिव काढले बाहेर, ते पाहून अवघे जग झाले अवाक्!

मृत्यूनंतर जेव्हा मृतदेह जमिनीत पुरला जातो तेव्हा, तो फारफार तर एका आठवड्यात किंवा दहा दिवसांत नष्ट होऊन जातो. परंतु, थायलंडमधील एका बौद्ध भिक्खुबद्दल आश्चर्यकारक घटना घडली आहे

  • Share this:

22 जानेवारी : मृत्यूनंतर जेव्हा मृतदेह जमिनीत पुरला जातो तेव्हा, तो फारफार तर एका आठवड्यात किंवा दहा दिवसांत नष्ट होऊन जातो. परंतु, थायलंडमधील एका बौद्ध भिक्खुबद्दल आश्चर्यकारक घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह हा दोन महिन्यानंतरही नष्ट झाला नव्हता.

एका धार्मिक विधीसाठी त्यांचं पार्थिव बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा त्यांचं पार्थिव  पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाले. त्यांच्या शरीरावर असा कोणताच परिणाम झाला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं.

16 नोव्हेंबर 2018 रोजी बौद्ध भिक्खु गुरू लुआंग फोर पियान यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं होतं. मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव ज्या विहारात ते सेवा करत होते, त्याच परिसरात दफन करण्यात आले होते.

ठीक दोन महिन्यानंतर एका विधीसाठी त्यांचं पार्थिव बाहेर काढण्यात आलं होतं. जेव्हा पार्थिव बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा लुआंग यांच्या शरीरावर कोणताही परिणाम झाला नव्हता. त्यांचे शरीर जशाच तसे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या चेहऱ्यावर एस स्मित हास्य होतं. त्यांना पाहुन असं वाटत होतं की, ते गाढ झोपलेले आहे.

बौद्ध भिक्खु यांचं पार्थिव पाहुन वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजही अवाक् झाले होते. त्यांचं म्हणणं होतं की, त्यांचं पार्थिव पाहुन असं वाटतं जणू 36 तासांपूर्वीच त्यांचा दफनविधी झाला आहे. तर अनुयायांचं म्हणणं आहे की, त्यांना निर्वाण प्राप्त झालं, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.

थायलंडमध्ये कोणत्याही बौद्ध भिक्खुचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यानंतर त्यांचं पार्थिव एका खास विधीसाठी बाहेर काढलं जातं. पार्थिव बाहेर काढल्यानंतर त्यांना नवे वस्त्र परिधान केले जातात. त्यानंतर पुढील 40 दिवस त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते. त्यानंतर 100 व्या दिवशी त्या बौद्ध भिक्खुचं पार्थिव कायम स्वरूपी दफन केलं जातं.

======================

First published: January 22, 2019, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading