रोम, 02 जुलै : कधी कोणत्या प्राण्याला फाशीची शिक्षा दिल्याचं ऐकलं आहे का? नाही ना, पण असा प्रकार खरच घडला आहे. इटलीमध्ये चक्क एका अस्वलाला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वी उत्तर इटलीतील हिल्स ऑफ ट्रेन्टिनो येथे एका तपकिरी अस्वलानं दोन व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. यानंतर या कुटुंबियांनी अस्वलाविरुद्ध तक्रार केली. आता या अस्वलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
59 वर्षीय फेबिओ मिस्सरोनी आपल्या 28 वर्षीय मुलगा ख्रिश्चियन मिस्सरोनी सोबत माउंट पेलर रस्त्यावर हायकिंगसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर अस्वलानं हल्ला केला. CNN दिलेल्या वृत्तानुसार, ख्रिश्चियनवर हल्ला करण्याचा अस्वलानं प्रयत्न केला. अखेर त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी फेबिओनं अस्वलाच्या पाठीवर उडी मारली. त्यावेळी मात्र अस्वलानं फेबिओवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फेबिओचा पाय थोडक्यात वाचला. हल्ला केल्यानंतर मात्र अस्वल जंगलात पळून गेलं.
वाचा-अजगर आणि साळींदरामध्ये जोरदार झटापट, थरारक VIDEO व्हायरल
या घटनेनंतर ट्रेटीनोचे राज्यपाल मौरिजिओ फुगाट्टी यांनी अस्वलाला पकडून त्याला फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे. यासाठी आदेशही जारी करण्यात आले आहेत. या अस्वलाचा शोध घेण्यासाठी अधिकारी डीएनएचा वापर करणार आहेत. दरम्यान, राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयावर सर्वत्र टीका केली जात आहे. प्राणीप्रेमींनी या निर्णयावर टीका करत याचिकाही सुरू केली आहे. वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडनं केलेल्या ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत 22 हजारहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एवढेच नाही तर इटलीचे पर्यावरण मंत्री सुद्धा या फाशीच्या विरुद्ध आहेत.
वाचा-तरुणाच्या हातात केळं पाहून अंगावर आला सरडा, श्वास रोखून ठेवणारा VIDEO VIRAL
याआधीही एका 12 वर्षांच्या मुलावर केला होता हल्ला
मेमध्ये असा प्रकार घडला होता, उत्तर इटलीतील हिल्स ऑफ ट्रेन्टिनो येथे एका तपकिरी अस्वलानं 12 वर्षांच्या अलेक्झांडरवर हल्ला केला होता. अलेक्झांडर कुटुंबासमवेत हायकिंग करत होता. द सनच्या वृत्तानुसार, घाबरून न जाता हा मुलगा शांत राहिला आणि आईच्या सूचनेचे पालन करून तो खाली आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
वाचा-लग्नमंडपात डान्स करणाऱ्या महिलेच्या छातीवर तरुणानं मारली लाथ, VIDEO VIRAL
संकलन-प्रियांका गावडे.