• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • हैवान! भावानं सख्ख्या बहिणींना आठव्या मजल्यावरून फेकलं; म्हणे, खूप दंगा करतात

हैवान! भावानं सख्ख्या बहिणींना आठव्या मजल्यावरून फेकलं; म्हणे, खूप दंगा करतात

भावाने सख्ख्या बहिणींना आठव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची घटना (Brother thrown his sisters down from eighth floor) समोर आली आहे. बहिणी खूप दंगा करतात, अशी तक्रार करत त्याने स्वतःच्या दोन लहान बहिणींना थेट आठव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं.

 • Share this:
  मॉस्को, 2 नोव्हेंबर: भावाने सख्ख्या बहिणींना आठव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची घटना (Brother thrown his sisters down from eighth floor) समोर आली आहे. बहिणी खूप दंगा करतात, अशी तक्रार करत त्याने स्वतःच्या दोन लहान बहिणींना थेट आठव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. या घटनेत दोन्ही अल्पवयीन मुलींचा मृत्यू (Two minor girls died after falling from eighth floor) झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. बहिणींवर वैतागलेला भाऊ रशियातील 23 वर्षाचा आरोपी ओचुर सॅचेट हा आपल्या बहिणींच्या दंगामस्तीला कंटाळला होता. मात्र त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या या मुली त्यांच्या वयाप्रमाणे दंगामस्ती आणि मौजमजा करतच होत्या. बहिणींनी शांत राहावं, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या ओचुरने रागाच्या भरात दोन्ही बहिणीना उचलून आठव्या मजल्यावरून खाली फेकलं. या घटनेत दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला. एक बहीण 14 वर्षांची होती, तर दुसरी केवळ 9 वर्षांची होती. मोठ्या बहिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाल, तर छोट्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी ऐकल्या किंकाळ्या घटना घडली त्यावेळी घरात ओचुर आणि त्याच्या दोन बहिणी असे तिघेच होते. त्यांच्या आईची रात्रपाळी असल्यामुळे ती कामावर गेली होती. एका कॅफेत काम करणाऱ्या आईला ही घटना समजल्यानंतर जबर धक्का बसला. घटनेच्या वेळी शेजाऱ्यांनी ओचुरच्या बहिणींच्या जोरदार किंकाळ्या ऐकल्या. मात्र नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी बाहेर येण्यापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाला होता. हे वाचा- स्पेस स्टेशनमध्ये पिकली मिरची, अंतराळवीरांनी बनवली चवदार Dish; पाहा PHOTOs पोलीस कारवाई सुरू पोलिसांनी आरोपी ओचुरला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिणी दंगा करतात, या किरकोळ कारणावरून सख्ख्या भावानेच त्यांचा जीव घेतल्यामुळे दुःख आणि चीड व्यक्त केली जात आहे.
  Published by:desk news
  First published: