बहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य

बहीण भावावरच होता प्रेमाचा संशय, मोठ्या भावांनी संपवले दोघांचे आयुष्य

ज्या तरुणासोबत बहिणीचे प्रेमसंबंध होते तो विवाहित होता आणि त्याला चार मुलं होती.

  • Share this:

16 नोव्हेंबर : पाकिस्तानमधील खैबर-पख्तुनख्वा प्रांतामध्ये खोट्या प्रतिष्ठेसाठी दोन भावांनी आपल्याच बहिणीची आणि नात्यातील एका भावाची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या २ आरोपी भावांनी आपल्या १५ वर्षांची बहिणीचे नात्यातील एका भावासोबत प्रेमसंबंध होते असा संशय होता. ज्या तरुणासोबत बहिणीचे प्रेमसंबंध होते तो विवाहित होता आणि त्याला चार मुलं होती.


आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा राग दोन्ही भावांना अनावर झाला. त्यानंतर त्यांनी दोघांनी ठार मारण्याचे नियोजन केले.  मृत भाऊ हा शेतात काम करत होता तेव्हा या २ भावांनी त्यांच्यावर प्राणघात हल्ला केला आणि त्याची हत्या केली. घरी आल्यानंतर आपल्या बहिणीला गोळ्या झाडून ठार मारले. दोघांचीही हत्या करून दोन्ही भाऊ पसार झाले.


ही घटना शांगला जिल्ह्यात घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही आरोपांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार केले आहे.


याआधीही पाकिस्तानमध्ये अशा घटना घडल्या होत्या. एका जन्मदात्या बापाने आपल्या २१ वर्षीय मुलीची गळा कापून निर्घृण हत्या केली होती.


डाॅन दैनिकाच्या वृत्तानुसार,हे प्रकरण एट्टोक जिल्ह्यातील एका गावात घडले होते.  प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी घरी पोहोचला होता. तिथे मुलीचे वडील आणि काकांनी त्यांना पकडले. त्यानंतर या मुलीच्या वडिलाने आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला रस्सीने बांधून दोघांचेही शीर धडा वेगळे केले होते.


पाक पोलिसांनी या मुलीचे वडील आणि काकांना अटक केली होती. आॅनर किलिंग प्रकरणाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानने आधीपासूनच कायदा तयार केला आहे. पण तरीही अशा घटनांना आळा बसला नाही. आॅक्टोबर २०१६ पासून आतापर्यंत २८० अशी प्रकरण समोर आली.


=======================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 10:12 PM IST

ताज्या बातम्या