Home /News /videsh /

ऑस्ट्रेलियाची मान शरमेने खाली; संसद भवनातच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

ऑस्ट्रेलियाची मान शरमेने खाली; संसद भवनातच महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार

Australia

Australia

संसद भवनातच हा प्रकार घडल्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. 2 वर्ष उलटून गेली पण अजुनही ही महिला न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

कॅनबेरा, 16 फेब्रुवारी: देश कितीही पुढे गेला, लोक कितीही सुशिक्षित झाले तरी सुद्धा महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाहीत. संसद भवन ज्या ठिकाणावरुन देशाचा कारभार चालतो, देशाला पुढे नेण्यासाठी निर्णय घेतले जातात अशा ठिकाणी बलात्काराची घटना घडली असं ऐकल्यावर कोणाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अशीच घटना प्रगत राष्ट्र म्हणून ओळख असलेल्या ऑस्ट्रेलियात घडली आहे. एका माजी सरकारी कर्मचारी महिलेने ऑस्ट्रेलियन संसद भवनामध्ये (Australian Parliament) तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्याच दालनात बलात्कार झाल्याचे तिने म्हटले असून या प्रकरणात पंतप्रधानांनी मदत न केल्याचा आरोप तिने केला आहे. 26 वर्षाच्या ब्रिटनी हिगिन्स (Brittany Higgins) या महिलेने हा आरोप केला आहे. 2018 मध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत तिने दारु प्यायली होती. एक सहकारी तिला संसद भवनातील संरक्षण मंत्र्याच्या दालनात घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप तिने केला आहे. त्यावेळी स्कॉट मॉरिसन यांच्या युतीचे सरकार होते. पंतप्रधानांनी त्यावेळी या घटनेची योग्य चौकशी केली नाही, असा आरोप देखील तिने केला आहे. परंतु या महिलेने अद्याप आरोपीचे नाव सांगितले नाही. ब्रिटनी हिगिन्स त्यावेळी 24 वर्षांची होती. तिने दिलेल्या माहितीनुसार, 'मी काही सहकाऱ्यांसोबत पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी मी दारु प्यायली. माझ्या एका सहकाऱ्याने मला घरी सोडण्याची ऑफर दिली. पण त्या व्यक्तीने मला माझ्या घरी सोडण्याऐवजी संसद भवनात घेऊन गेला. त्या ठिकाणी संरक्षण मंत्र्याच्या दालनात त्याने माझ्यावर बलात्कार केला. मला शुद्ध आल्यानंतर मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मला यश आले नाही.' ब्रिटनी हिगिन्सने पुढे सांगितले की, 'माझ्यासोबत झालेल्या बलात्कार प्रकरणाची माहिती मी माझ्या इतर सहकाऱ्यांना दिली. सरकार आणि पोलिसांना देखील सर्व माहिती सांगितली आणि पुरावे दिले. डेमोक्रेटिक पार्टीने मला न्याय देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र अजूनपर्यंत मला न्याय मिळाला नाही.'

हे देखील वाचा -  धक्कादायक! मशिदीत सुरू होतं बाँब बनवण्याचं ट्रेनिंग; स्फोटात 30 दहशतवादी ठार झाल्यानं आलं उघडकीस

ब्रिटनीने अद्याप तिच्यावर बलात्कार करणाऱ्याचे नाव सांगितले नाही. तिने फक्त तो व्यक्ती लिबरल पार्टीचा असल्याचे सांगितले. ब्रिटनीने सांगितले की, 'मी त्यावेळी खूप नशेत होती. मी संरक्षण मंत्र्यांना याबाबत सांगितले. 12 अन्य लोकांना देखील याबाबत सांगितले. या घटनेच्या काही दिवसांनंतर पंतप्रधान मॉरिसन (Australia's Prime Minister) यांनी निवडणुकीची घोषणा केली होती.' आता मॉरिसन (Scott Morrison) यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचे सांगितले. धक्कादायक गोष्ट ही आहे की पक्षाने ब्रिटनी हिगिन्सला पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. हिगिन्सने आरोप केला की, 'मला सांगितले होते की नोकरी वाचवायची असेल तर पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घे आणि मला शांत बसण्यास सांगण्यात आले होते.' ऑस्ट्रेलियन सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 15 वर्षांवरील प्रत्येक सहा मुलींपैकी एका मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडते. बऱ्याच घटनांमध्ये या मुली किंवा महिलांवर त्यांच्या कामाच्या ठिकाणीच बलात्कार करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. Link -https://www.bhaskar.com/international/news/australian-parliament-rape-case-update-pm-scott-morrison-on-victim-brittany-higgins-128235065.html
Published by:news18 desk
First published:

Tags: Australia, Parliament, Rape case

पुढील बातम्या