Elec-widget

पंतप्रधानांनी केला गैरव्यवहार; महिला पत्रकाराच्या आरोपाने खळबळ

पंतप्रधानांनी केला गैरव्यवहार; महिला पत्रकाराच्या आरोपाने खळबळ

युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भात (ब्रेक्झिट) सध्या तणावात असलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

  • Share this:

लंडन, 01 ऑक्टोबर: युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भात (ब्रेक्झिट) सध्या तणावात असलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (british prime minister johnson)यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. जॉनसन यांच्यावर एका महिला पत्रकाराने गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. ही घटना 20 वर्षापूर्वीची असून एका कार्यक्रमता त्यांनी आपल्याशी गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. इंग्लंडच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एका मॉडलने त्यांच्यावर असे आरोप केले होते.

जॉनसन जेव्हा लंडनचे महापौर होते तेव्हा एका अमेरिकन मॉडलने त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. आता आरोप केलल्या महिला पत्रकाराचे नाव शार्लोट एडवर्डस असे आहे. यासंदर्भात त्यांनी संडे टाईम्स या वृत्तपत्रात एक लेख लिहला आहे. जॉनसन यांनी 20 वर्षांपूर्वी म्हणजे 1999मध्ये एका कार्यक्रमात गैरव्यवहार केला होता. तेव्हा एडवर्डस स्पेक्टेटर या वृत्तपत्रात काम करत होत्या.

जॉनसन यांनी दिले उत्तर...

एडवर्डस यांनी केलेले सर्व आरोप सोमवारी पंतप्रधान जॉनसन यांनी फेटाळून लावले. पंतप्रधान म्हणून जॉनसन हे प्रथमच पक्षाच्या वार्षिक बैठकीत बोलणार आहेत. त्याआधीच त्याच्यांवर हे आरोप झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, एडवर्डस यांनी असा ही दावा केला की, संबंधित घटनेनंतर एका महिलेला यासंदर्भात सांगितले असता तिने देखील जॉनसन यांनी अशा प्रकारचे गैरव्यवहार केल्याचे सांगितले. पंतप्रधान जॉनसन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी एडवर्डस त्यांनी केलेल्या आरोपावर ठाम आहेत.

एका बाजूला युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे आणि पक्षाच्या वार्षिक बैठकीच्या आधी पंतप्रधानांवर झालेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. ब्रिटन 3 ऑक्टोबर रोजी युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. आता त्यात खुद्द पंतप्रधानांवर अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे सर्व लक्ष ब्रेक्झिटवरून पंतप्रधानांवर केंद्रीत झाले आहे.

Loading...

VIDEO : उपमुख्यमंत्री कोण होणार? चंद्रकांत पाटील म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 07:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...