मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'तो भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न', शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचं अजब वक्तव्य

'तो भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न', शेतकरी आंदोलनाबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचं अजब वक्तव्य

 भारत-पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा आणि शेतकरी आंदोलन यामध्ये गल्लत करत त्यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

भारत-पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा आणि शेतकरी आंदोलन यामध्ये गल्लत करत त्यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

भारत-पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा आणि शेतकरी आंदोलन यामध्ये गल्लत करत त्यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

नवी दिल्ली,10 डिसेंबर: राजधानी दिल्लीच्या विविध सीमांवर देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. सप्टेंबर महिन्यात भारत सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी हे शेतकरी आहेत. या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. पण त्याबद्दल ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन संपूर्णपणे अनभिज्ञ आहेत. भारत-पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा आणि शेतकरी आंदोलन यामध्ये गल्लत करत त्यांनी अजब विधान केलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

ब्रिटिश संसदेच्या हाउस कॉमन्समध्ये मजूर पक्षाचे खासदार तन्मनजितसिंग ढेसी यांनी बुधवारी पंतप्रधांनाशी प्रश्नोत्तरांच्या सत्रात भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारल्यावर तो भारत आणि पाकिस्तानचा प्रश्न आहे असं अजब उत्तर पंतप्रधान बोरिस यांनी सदनात दिलं आहे. त्यामुळे पंतप्रधनात शरीराने सदनात आणि मनाने कुठल्या ग्रहावर होते? असा प्रश्न विचारला जात आहे.

त्याचं झालं असं बुधवारी हाउस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याच्या सत्रात खासदार ढेसी म्हणाले, ‘विशेषत: पंजाब आणि भारतातील इतर राज्यांतील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या ब्रिटिश संसदेत खासदार असलेल्या अनेकांना या शेतकरी आंदोलनाची व्हिडीओ दृश्य पाहून चिंता वाटते आहे. दिल्लीत शांततेने सुरू असलेल्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोडून काढण्यासाठी वॉटर कॅनन, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि मोठी शक्ती वापरली जात आहे.

हे वाचा-चिंता वाढली! काश्मीरनंतर आता गुजरात सीमेवर चीन आणि पाकिस्तानने केलं कारस्थान

खासदार ढेसी हे शीख असून मूळचे भारतीय वंशाचे आहेत. भारतातील आंदोलनाला ब्रिटनमध्ये पाठिंबा देणाऱ्यांचं नेतृत्व ते अनेक दिवसांपासून करत आहेत. ढेसींनी ही पार्श्वभूमी सांगून पंतप्रधान बोरिस यांना प्रश्न विचारला, ‘मी असं विचारू इच्छितो की या परिस्थितीची दखल घेऊन पंतप्रधान (जॉन्सन) आपल्याला (ब्रिटनला) या आंदोलनाबाबत वाटणारी चिंता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतील का? तसंच प्रत्येकालाच शांततेने निदर्शनं करण्याचा मूलभूत अधिकार आहे हे जॉन्सन यांना मान्य आहे ना? आणि भारतातील शेतकरी प्रश्नावर लवकर मार्ग काढण्याची विनंती जॉन्सन मोदींना करतील का?’

जॉन्सन यांनी उभं राहून या प्रश्ना त्रोटक स्वरूपाचं उत्तर दिलं पण ते अगदी असंबद्ध होतं. म्हणजे ते शुद्धीवर आहेत का असा प्रश्न हे उत्तर वाचणाऱ्यांच्या मनात आला. जॉन्सन म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये जे चाललंय त्याबाबत ब्रिटनचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. पण हा त्या दोन देशांमधला प्रश्न आहे. त्यामुळे तो त्यांनीच सोडवावा अशी आपली भूमिका आहे.’

हे उत्तर ऐकून ढेसी आश्चर्यचकितच झाले आणि त्यांनी ट्विटमध्ये आपला प्रश्न लिहिला आणि पुढं अशी खोचक टिपण्णी केली, ‘पण जर आपल्या पंतप्रधानांना ते कशाबद्दल बोलत आहेत हे माहीत असतं तर बरं झालं असतं.’ त्या आधी ढेसी यांनी ब्रिटनमधील 35 खासदारांच्या स्वाक्षरी असलेलं एक पत्र फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसला (FCDO) पाठवलं होतं. याला उत्तर देताना FCDO च्या प्रवक्त्यानी गेल्या आठवड्यातच स्पष्ट केलं होतं की पोलिसांनी शेतकरी आंदोलन हाताळणं हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचं ब्रिटनचं मत आहे.

शेतकरी नेते आणि केंद्र सरकारचे मंत्री यांच्यात अनेकदा चर्चा झाली असून सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दाखवली असून, शेतकऱ्यांनी हे कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.

First published: