पंतप्रधानांनी 5 वर्षांच्या कार्यकाळाआधीच रचला इतिहास, आधी घटस्फोट आता लग्नाआधीच होणार बाबा!

पंतप्रधानांनी 5 वर्षांच्या कार्यकाळाआधीच रचला इतिहास, आधी घटस्फोट आता लग्नाआधीच होणार बाबा!

ब्रिटनच्या अडीचशे वर्षांच्या इतिहासातील हे प्रथमच असेल जेव्हा पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात एखाद्या राजकारण्याने लग्न केले आहे.

  • Share this:

लंडन, 01 मार्च : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (55) यांनी प्रेयसी कॅरी सिमंड्स (31) यांच्यासोबत साखरपुडा केला. मुख्य म्हणजे बोरिस यांनी प्रेयसी कॅरी लग्नाआधीच गरोदर आहे. त्यामुळंच बोरिस आणि कॅरी यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापूर्वी कॅरी सिमंड्ससोबत रिलेशनशीपमध्ये होते. आता हे दोघं बाळाच्या जन्माआधी लग्न करणार आहेत.

ब्रिटिश माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनच्या अडीचशे वर्षांच्या इतिहासातील हे प्रथमच असेल जेव्हा पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात एखाद्या राजकारण्याने लग्न केलं आहे. जॉन्सन हे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान झाले आहेत ज्यांनी आपल्या कार्यकाळात घटस्फोट घेतला आणि आता लग्न करत आहेत.'द सन' ने दिलेल्या बातमीनुसार, जॉन्सन आणि कॅरी यांनी ही बातमी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र मिडीयामुळे ही बातमी समोर आली आहे.

वाचा-VIDEO : लय भारी! या तरुणाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुम्हीही व्हाल थक्क

वाचा-3 मुलांची आई न्यूड होऊन करते घरकाम, ‘हे’ आहे व्यवसायामागचे लॉजिक

कोण आहे कॅरी सिमंड्स?

ब्रिटिश माध्यमांच्या वृत्तानुसार जॉन्सन आणि कॅरी सध्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी आहेत. कॅरी या पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत आणि त्या ब्रिटनच नाही तर देशातील पर्यावरणीय प्रकल्पांवर काम करत आहे. कॅरी अजूनही तिच्या कामात व्यस्त आहे. याआधी बोरिस जॉन्सन आणि कॅरी सिमंड्स नवीन वर्षाच्या सुट्ट्या सेंट लुसियात येथे घालवल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. कारण प्रोटोकॉल विसरून हे दोघं विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होते. या दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आता जॉन्सन हे आपल्या लग्नामुळं चर्चेत आले आहेत.

वाचा-हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला VIDEO

वाचा-Zomato च्या डिलिव्हरी बॉयने जिंकलं सगळ्यांचं मन, VIDEO तुफान VIRAL

डेली मेलच्या वृत्तानुसार, पंतप्रधान बोरिस एअरफोर्सच्या एका खासगी विमानात प्रवास करू शकतात, ज्याची किंमत 93 लाख आहे. पण इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करून त्याने सर्वसामान्यांच्या करातील 90 लाख रुपयांची बचत केली, तरी त्यांच्यावर टीका करण्यात आली. पंतप्रधान जॉन्सन यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मेरीना व्हीलर असून त्यांना चार मुले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: britain
First Published: Mar 1, 2020 02:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading