News18 Lokmat

विकिलिक्सचा संपादक ज्युलियन असांजला लंडन पोलिसांकडून अटक!

गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणाऱ्या विकिलिक्स या संकेतस्थळाचा मुख्य संपादक ज्युलियन असांज याला गुरुवारी ब्रिटिश पोलिसांनी अटक केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 05:51 PM IST

विकिलिक्सचा संपादक ज्युलियन असांजला लंडन पोलिसांकडून अटक!

लंडन, 11 एप्रिल: गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणाऱ्या विकिलिक्स या संकेतस्थळाचा मुख्य संपादक ज्युलियन असांज याला गुरुवारी ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. असांजने 2012मध्ये लंडनमधील इक्वेडोर दुतावासात शरण घेतली होती. तेव्हापासून तो तेथेच होता.

47 वर्षीय असांजला मेट्रोपॉलेटिन पोलीस दलाने गुरुवारी 11 एप्रिल रोजी अटक केल्याचे पोलीसांनी सांगितले. इक्वेडोर सरकारने असांजला दिलेला आश्रय काढून घेतल्यानंतर लंडन पोलिसांनी ही कारवाई केली. दुतावासातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलवून घेतल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

असांजवर स्वीडनमध्ये लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणात त्याला ब्रिटनच्या न्यायालयाने 2012मध्ये जामीन दिला होता. तेव्हापासून तो इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात आश्रयाला होता.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2019 03:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...