साहेबाच्या देशावर आता 'देशी' राज्य; ब्रिटीश मंत्रिमंडळातला भारतीय वट वाढला

साहेबाच्या देशावर आता 'देशी' राज्य; ब्रिटीश मंत्रिमंडळातला भारतीय वट वाढला

ब्रिटीश मंत्रिमंडळातला भारतीय टक्का वाढला. पाकिस्तानी वंशाच्या मंत्र्याला हटवून नारायण मूर्तींचा जावई झाला अर्थमंत्री. सध्या इंग्रजांच्या मंत्रिमंडळात 3 भारतीय चेहरे आहेत आणि ते महत्त्वाची खाती सांभाळत आहेत.

  • Share this:

लंडन, 13 फेब्रुवारी : भारतासह जवळपास निम्म्या जगावर एकेकाळी राज्य करणाऱ्या ब्रिटनमध्ये सध्या मात्र सत्तेच्या काही दोऱ्या मूळच्या भारतीय व्यक्तींच्या हाती आल्या आहेत. युनायटेड किंगडमच्या UK नव्या मंत्रिमंडळात तीन भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींची वर्णी लागली आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावणी ऋषी सुनाक (Rishi Sunak) यांच्यासह अन्य दोन भारतीय वंशाचे मंत्री ब्रिटनच्या मंत्रिमंडळात सध्या आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी अचानक मंत्रिमंडळात काही फेरबदल केले. त्यानुसार पाकिस्तानी वंशाच्या साजिद जाविद यांना राजीनामा द्यायला सांगण्यात आलं. चॅन्सेलर ऑफ एक्सचेकर (Chancellor of the Exchequer) या पदावर ते होते. भारतीय अर्थमंत्र्यांच्या समकक्ष असं हे पद आहे. त्यांच्या जागी ऋषी सुनाक यांना अर्थमंत्री म्हणून नेमण्यात आलं आहे. ऋषी सुनाक यांच्याशिवाय आणखी दोन भारतीय वंशाच्या व्यक्ती ब्रिटीश मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. प्रीती पटेल (priti patel) आणि अलोक शर्मा (Alok sharma) हे जुलैपासूनच जॉन्सन मंत्रिमंडळाचा भाग आहेत.

प्रीती पटेल सध्या गृहखातं सांभाळत आहेत. थेरेसा मे सरकारमध्येही होता. पण गुप्तपणे किंवा खासगी दौऱ्यादरम्यान काही देशांबरोबर बैठक घेतल्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता जॉन्सन यांनी त्यांना पुन्हा स्थान दिलं आहे.

जावई माझा भला, नारायण मूर्तींचे जावई ऋषी सुनाक बनले ब्रिटनचे अर्थमंत्री

अलोक शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या आग्र्याचा. ते रोजगार मंत्री म्हणून काम पाहतात. अशा प्रकारे ब्रिटीश सरकारची तीन महत्त्वाची खाती भारतीय वंशांच्या मंत्र्यांकडे आली आहेत.

त्यामुळे सध्या इंग्रजांच्या मंत्रिमंडळात 3 भारतीय चेहरे आहेत. ब्रिटीश पार्लमेंटमध्ये 650 पैकी सध्या 65 प्रतिनिधी गोरे नाहीत. त्यातले 15 जण भारतीय वंशाचे आहेत. एवढी भारतीयांची संख्या ही आतापर्यंतची विक्रमी संख्या मानली जात आहे.

बापरे! अंटार्क्टिकाचं तापमान झालं मुंबईएवढं! आतापर्यंतची सर्वाधिक नोंद

First published: February 13, 2020, 10:13 PM IST

ताज्या बातम्या