• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • 200 कोटींची फ्लाईट, एका व्यक्तीला DEPORT करणं सरकारला पडलं महागात

200 कोटींची फ्लाईट, एका व्यक्तीला DEPORT करणं सरकारला पडलं महागात

एका व्यक्तीला त्याच्या देशात डिपोर्ट करणं (Government spends crores to deport citizens) सरकारला चांगलंच महागात पडल्याचं समोर आलं आहे.

 • Share this:
  लंडन, 19 सप्टेंबर : एका व्यक्तीला त्याच्या देशात डिपोर्ट करणं (Government spends crores to deport citizens) सरकारला चांगलंच महागात पडल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनमधून (Britain) एका व्यक्तीला त्याच्या देशात पाठवण्यासाठी सरकारला 17 मिलियन पाउंड (17 million pound) खर्च केले. भारतीय चलनात विचार केला तर ही रक्कम होते 1,72,14,29,197 रुपये. ‘द सन’ या वृत्तपत्रानं या बाबीचा खुलासा केला आहे. यासाठी केला खर्च ब्रिटनमध्ये आलेले घुसखोर, गुन्हेगार आणि अवैधपणे राहणाऱ्या इतर नागरिकांना ब्रिटन सरकारकडून त्यांच्या त्यांच्या देशात पाठवण्यात येतं. त्यासाठीचा खर्च सरकारकडून करण्यात येतो. या सर्वांना सरकारी खर्चाने विमानातून त्यांच्या त्यांच्या घरी सोडण्यात येतं. यासाठी सरकारला कोट्यवधी रुपयांचा खर्च येत असतो. रिपोर्टमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात करदात्यांच्या पैशातून 218 सीटर विमानाने केवळ एका प्रवाशाला त्याच्या देशात सोडलं. यासाठी 14 जणांचा स्टाफ या विमानात होता. या फ्लाईटसाठी ब्रिटीश सरकारनं 1 अब्ज रुपयांपेक्षाही जास्त खर्च केला. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार एका वर्षात दर व्यक्तीला त्याच्या देशात सोडण्यासाठी करण्यात आलेला खर्च हा सरासरी 13,354 पाउंड म्हणजेच 13,52,233 रुपये एवढा आहे. याचं एकूण बजेट 17.1 मिलियन पाउंडपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. हे वाचा -काबुल विमानतळावरील आत्मघातकी हल्लेखोर होता भारतातील तुरुंगात, ISIS चा दावा गेल्या वर्षात अशा प्रकारचे 6 विमानं उडवण्यात आली, ज्यांच्यातून विविध गुन्हेगार आणि अवैध रहिवाशांना त्यांच्या त्यांच्या देशात सोडण्यात आलं. यातील सर्वात लांब आणि महागडी ट्रीप ही अल्बानियाची होती. या विमानातून 34 जणांना पाठवण्यात आलं. या विमानात 121 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तर केवळ तीन जणांना फ्रान्स आणि इटलीला पाठवण्यासाठी 267 सीटर विमान पाठवण्यात आलं होतं.
  Published by:desk news
  First published: