मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या PM होण्याला बोरिस जॉन्सन यांचा विरोध? ह्या गोष्टीचा आहे राग

भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्या PM होण्याला बोरिस जॉन्सन यांचा विरोध? ह्या गोष्टीचा आहे राग

बोरिस जॉन्सन यांनी ऋषी सुनक यांच्या विरोधात उघडपणे बंड केले आहे. बोरिस जॉन्सन इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. पण, ते ऋषींना पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

बोरिस जॉन्सन यांनी ऋषी सुनक यांच्या विरोधात उघडपणे बंड केले आहे. बोरिस जॉन्सन इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. पण, ते ऋषींना पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

बोरिस जॉन्सन यांनी ऋषी सुनक यांच्या विरोधात उघडपणे बंड केले आहे. बोरिस जॉन्सन इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. पण, ते ऋषींना पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत.

    लंडन, 16 जुलै : ज्या ब्रिटीशांना भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं, त्या देशाच्या पंतप्रधानपदी एक भारतीय वंशाचा व्यक्ती बसण्याची दाट शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीची लढत रंजक होत आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक (rishi sunak) यांनी दोन फेऱ्यांनंतर चांगली आघाडी कायम ठेवली आहे. पण, त्यांच्या मार्गात आव्हाने आहेत. यातील मोठं आव्हान पंतप्रधानपदावरुन नुकतेच पायउतार झालेले बोरिस जॉन्सन आहेत. ज्यांना ऋषी सुनक पंतप्रधान म्हणून बघायचे नाही. बोरिस जॉन्सन सुनक वगळता इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या वतीने अन्य उमेदवारांना कोणत्याही किंमतीत सुनक यांना पाठिंबा देऊ नका, असे सांगण्यात येत आहे. बोरिस यांच्या या भूमिकेमागे, ते ऋषींना त्यांची सत्ता गमावण्याचे प्रमुख कारण मानत आहेत. बोरिस जॉन्सन यांचे मत आहे की, गेल्या काही महिन्यांपासून ऋषी त्यांना सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न करत होते. ऋषी यांच्यामुळेच त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एका अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, बोरिस जॉन्सन सत्ता गमावण्यासाठी साजिद जावेद यांना जबाबदार धरत नाहीत. ..म्हणून ऋषी सुनक यांना विरोध बोरिस जॉन्सन केवळ ऋषी सुनक यांना त्यांच्या सत्ता गमावण्यास जबाबदार मानत आहेत. त्यांचा सगळा राग ऋषींवर आहे. बोरिस यांची एका निश्चित रणनीतीखाली सत्तेतून हकालपट्टी करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. मोठी गोष्ट म्हणजे बोरिस जॉन्सन ऋषी सुनक यांना विरोध करत आहेत, तर परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांना पंतप्रधान बनवण्यासाठी ते खूप जोर देत आहेत. ऋषींना त्यांचा विरोध इतका आहे की ते यावेळी कनिष्ठ व्यापार मंत्री पेनी मॉर्डंटला पाठिंबा देण्यास तयार आहेत. याबद्दल जॉन्सनच्या सहकाऱ्याशी बोलले असता, त्यांनी हे मान्य केले आहे की केअरटेकर पीएम ऋषींबद्दल फारसे उत्सुक नाहीत. आपली फसवणूक झाली आहे, असा त्यांचा विश्वास आहे. पण, ऋषींशिवाय दुसरे कोणालाही ते पंतप्रधान होताना पाहू शकतील असे नाही. ..तर एक भारतीय वंशाचा व्यक्ती पहिल्यांदाच ब्रिटनचा PM होईल, दर रविवारी जातात मंदिरात ऋषी सुनक यांची स्थिती मजबूत सध्या ऋषी सुनक यांची स्थिती मजबूत दिसत आहे. सलग दोन फेऱ्यांमध्ये त्यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीबद्दल बोलायचे झाल्यास, टोरी पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हमनला सर्वात कमी मते मिळाली आणि ती या फेरीतून बाहेर पडली. ऋषी सुनक यांना सर्वाधिक मते मिळाली. सुनक यांना 101 तर दुसऱ्या क्रमांकावरील पेनी मॉर्डंट यांना 83 मते मिळाली. लिझ ट्रस यांना 64 मते, कॅमी बेडोनोच यांना 49 आणि टॉम तुगेंधत यांना 32 मते मिळाली. पंतप्रधानपदाची उत्सुकता वाढणार पण ही शर्यत इथेच संपलेली नाही. मतदानाची ही फेरी अशीच सुरू राहणार आहे. पुढील 5 दिवसांत 3 वेळा मतदान होणार आहे. प्रत्येक वेळी सर्वात कमी मतांचा उमेदवार बाद केला जाईल. ही प्रक्रिया 21 जुलैपर्यंत पूर्ण होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेत दोनच उमेदवार उरले असताना पंतप्रधानपदाची शर्यत अधिक रंजक होणार आहे. खरे तर सध्या ब्रिटनमध्ये टोरी पक्षाचे सरकार आहे. या शर्यतीत फक्त दोनच उमेदवार उरले असताना ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांकडून मते मागण्यासाठी देशभरात जातील. दोन्ही उमेदवारांमध्ये जो कोणी पक्षाचा नेता होईल, तो देशाचा पंतप्रधान असेल आणि बोरिस जॉन्सनची जागा घेतील.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Britain

    पुढील बातम्या