लंडन, 16 नोव्हेंबर : जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कोरोनाग्रस्त असलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं मी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे अशी माहिती स्वत: बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.
जॉन्सन यांन अँडरसनसह काही खासदारांशी 35 मिनिटांसाठी नुकतीच बैठक घेतली. याआधी बोरिस जॉन्सन यांना देखील कोरोनाचा संसर्ग होऊ गेला होता. त्यांच्यावर बरेच दिवस उपचार सुरू होते. त्यातून ते बरे झाल्यानंतर पुन्हा पीएम हाऊसमध्ये पोहोचले.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वत:ला क्वारंटाइन केल्याची माहिती स्वत: ट्वीट करून दिली आहे. मी कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहे. पण मला कोणतीही लक्षणं नाहीत. पण नियमांचं पालन करायला हवं. त्यासाठी मी स्वत:ला क्वारंटाइन करत असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Today I was notified by NHS Test and Trace that I must self-isolate as I have been in contact with someone who tested positive for COVID-19. I have no symptoms, but am following the rules and will be working from No10 as I continue to lead the government’s pandemic response.
— Boris Johnson (@BorisJohnson) November 15, 2020
हे वाचा-जगातील सर्वात महागडा कबूतर; एवढ्याशा कबूतरची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
कोरोनाचे लक्षण नसले तरी नियमांचं पालन म्हणून 26 नोव्हेंबरपर्यंत 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. कोरोना संसर्गाबाबत प्रशासनाला ते मार्गदर्शन घरी राहून करत राहातील असा विश्वास प्रधानमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षणं नाहीत असंही सांगण्यात आलं आहे.
याआधी काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अॅडहॉनम गॅब्रियेसस देखील अशाच प्रकारे एका कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus