मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाची 'ही' व्यक्ती आघाडीवर; 5 सप्टेंबरला ठरेल भवितव्य

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाची 'ही' व्यक्ती आघाडीवर; 5 सप्टेंबरला ठरेल भवितव्य

पंतप्रधानपदावर आतापर्यंत 11 जणांनी दावा केला आहे. यात भारतीय वंशाच्या अ‍ॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन, इराकी वंशाचे नादिम जहावी, नायजेरियन वंशाच्या केमी बेदानोक, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य टॉम टुगॅनडेट, माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, व्यापार मंत्री पेनी मोरडाउंट आणि परिवहन मंत्री ग्रॅंट शेप्स यांचा समावेश आहे.

पुढे वाचा ...
लंडन, 12 जुलै : ब्रिटनच्या (Britain) नव्या पंतप्रधानांची (New Prime Minister) घोषणा येत्या 5 सप्टेंबरला केली जाणार आहे. सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षानं (Conservative party) सोमवारी (11 जुलै 22) याबाबत माहिती दिली. सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 11 उमेदवार आहेत. बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ब्रिटनच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला असून, त्या जागी निवडून येणारी व्यक्ती नवीन पंतप्रधान असेल. यासाठी पक्षातून भारतीय वंशाचे असलेले आणि ब्रिटनचे माजी अर्थमंत्री मंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) याचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर दावा करणाऱ्या नेत्यांची संख्या सोमवारी 11 वर पोहोचली आहे. सुनक यांच्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या शर्यतीत व्यापार मंत्री पेनी मॉरडाउंट (Penny Mordaunt) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. परिवहन मंत्री ग्रॅंट शेप्स, माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट आणि पाकिस्तानी वंशाचे माजी आरोग्यमंत्री साजिद जाविद यांच्यानंतर मॉरडाउंट यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. या शिवाय ब्रिटनमधल्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि नवे पंतप्रधान म्हणून बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्याच्या शर्यतीत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनीही सोमवारी दावा सादर केला आहे. फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसमध्ये ट्रस यांचे सहाय्यक मंत्री असलेले रहमान चिश्ती हेदेखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत. पंतप्रधानपदासाठी 11 जण शर्यतीत पंतप्रधानपदावर आतापर्यंत 11 जणांनी दावा केला आहे. यात भारतीय वंशाच्या अ‍ॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन, इराकी वंशाचे नादिम जहावी, नायजेरियन वंशाच्या केमी बेदानोक, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य टॉम टुगॅनडेट, माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, व्यापार मंत्री पेनी मोरडाउंट आणि परिवहन मंत्री ग्रॅंट शेप्स यांचा समावेश आहे. भारतीय वंशाच्या वरिष्ठ नेत्या आणि ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल (Priti Patel) कट्टर ब्रेक्झिट (Brexit) समर्थक म्हणून पुढे येण्याची शक्यता असल्यानं त्याचं नावदेखील या यादीत समाविष्ट होऊ शकतं. पंतप्रधानपदाची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होईल. सर्वप्रथम कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार मतदानाच्या टप्प्यानंतर दोन उमेदवारांची निवड करतील. त्यानंतर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आपल्या नेत्याची निवड करतील. हा नेताच ब्रिटनचा नवा पंतप्रधान असेल. IPL खेळता पण टीम इंडियाकडून खेळताना.... गावसकरांनी घेतली दिग्गजांची हजेरी कोण आहेत ऋषी सुनक? नाट्यमय घडामोडींनंतर बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदावर कोणाची वर्णी लागणार याची ब्रिटनमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाचे माजी ब्रिटिश कॅबिनेट मंत्री ऋषी सुनक याचं नाव आघाडीवर आहे. 42 वर्षांचे ऋषी सुनक यांनी आता कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते आणि यूकेचे पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी आपल्या औपचारिक मोहिमेची सुरुवात केली आहे. `पीटीआय`ने दिलेल्या वृत्तानुसार, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांचे जावई असलेल्या सुनक यांना कॉमन्स लीडर मार्क स्पेन्सर, पक्षाचे माजी अध्यक्ष ऑलिव्हर डाउडेन आणि माजी कॅबेनिट मंत्री लियाम फॉक्स यांच्यासह अनेक वरिष्ठ सदस्यांचा पाठिंबा आहे. ब्रेक्झिटचे समर्थक असलेले आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार सुनक हे प्रशासकीय पक्षाची विस्कळीत झालेली घडी नीट बसवू शकतात. तसंच यूकेसमोर असलेल्या मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी माजी अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा निश्चित फायदा होऊ शकतो, असं मानलं जात आहे. सुनक यांनी जॉन्सन यांच्या राजीनाम्यापूर्वी काही तास त्यांची आजी श्रक्षा या पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतरित होतानाचा तसंच त्यांच्या भारतीय वंशाच्या कौटुंबिक वारशाचा वैयक्तिक संदर्भ असलेल्या गोष्टींचा एकत्रित व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, असं सुनक यांच्या कॅम्पनं स्पष्ट केलं आहे.
First published:

Tags: Britain, Politics

पुढील बातम्या