Home /News /videsh /

अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण मात्र ब्रिटनमध्ये मृत्यूदर जास्त का?

अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण मात्र ब्रिटनमध्ये मृत्यूदर जास्त का?

19 देशांची तुलना करून हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. 

    ब्रिटन, 28 मे : जगभरात सर्वात जास्त कोरोनाव्हायरसची प्रकरणं अमेरिकेत आहेत. मात्र सर्वात जास्त मृत्यूदर ब्रिटनमध्ये आहे. एका रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 891 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमधील मृत्यूचा हा आकडा जगातील इतर देशांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या स्पेन आणि इटलीतही ब्रिटनपेक्षा कमी मृत्यू झालेत. या देशातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि सेकंड वेव्ह आला नाही तर ब्रिटनमधील मृत्यूचा आकडा या देशांपेक्षा नेहमी जास्त राहिल. चीन, ब्राझील, रशियातही कोरोनामुळे भरपूर मृत्यू झालेत. मात्र या देशांचा मृत्यूदरही ब्रिटनच्या तुलनेत कमी आहे. फायनेन्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार 19 देशांच्या राष्ट्रीय स्टॅटिस्टिकल एजन्सीची मदत घेऊन डेथ रेट रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार ज्या देशात कोरोनाव्हायरसला रोखण्याासठी लॉकडाऊनचा निर्णय उशिरा घेण्यात आला त्या ठिकाणी एकूण मृत्यूचा आकडा खूप जास्त आहे. ब्रिटन आणि अमेरिका याचे उदाहरण आहेत. हे वाचा - वाचण्याची शक्यता होती फक्त एक टक्का; मात्र कोरोना रुग्णाने मृत्यूलाही दिला चकवा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डेव्हिड स्पेगेलहॉल्टर म्हणाले, जर आकड्यांवर विश्वास ठेवला तर आपण भरपूर लोकांना गमावलं आहे. ब्रिटनने कमी तयारी केली, असं सांगितलं जातं आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात काय होईल याची चिंता करायला हवी. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीतील असिस्टंट प्रोफेसर नताली डीन यांनी सांगितलं, इटलीमध्ये संक्रमण पसरल्यानंतर ब्रिटनकडे तयारीसाठी वेळ होता. मात्र तसं केलं गेलं नाही. ब्रिटनने लॉकडाऊनचा निर्णय इतक्या उशिरानं कसा घेतला याचंच मला आश्चर्य वाटतं आहे. ब्रिटनमधील नेते म्हणाले, आम्ही लॉकडाऊन लागू करण्यात उशीर केला. टेस्टिंगचा वेगही कमी आहे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पीपीई किट पोहोचवण्यासही उशीर झाला. हे वाचा - देशातील 6 मेगासिटींचे कोरोनाने केले हाल; एकट्या महाराष्ट्रातील 3 शहरांची अवस्था ब्रिटिश सरकारच्या प्रवक्त्यांनी मात्र रिपोर्ट फेटाळला आहे. मृत्यूच्या आकड्यांबाबत कोणताही निष्कर्ष आता काढणं योग्य नव्हे. त्यासाठी काही वेळ द्यायला हवा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या