5G टेक्नोलॉजीतून पसरतो कोरोना ...या अफवेनंतर चक्क लोकांनी जाळला टॉवर

5G टेक्नोलॉजीतून पसरतो कोरोना ...या अफवेनंतर चक्क लोकांनी जाळला टॉवर

ब्रिटनमध्ये कोरोना पाठोपाठ अफवांचं महासंकट, 5G टेक्नोलॉजीतून व्हायरस पसरू नये म्हणून जाळला टॉवर

  • Share this:

लंडन, 09 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या महासंकटानं जगभरात धुमाकूळ घातलं आहे. या महासंकटाचा सामना करण्यासोबतच आणखी एक मोठं संकट आहे ते म्हणजे सोशल मीडिया आणि पसरणाऱ्या अफवांनाही पेव फुटला आहे. या अफवांमुळे मोठं नुकसान होत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना आणखी एका समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचं संक्रमण हे संक्रमण 5G मुळे झपाट्यानं पसरत असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे सोशल मीडियावर 5G टेक्नोलॉजीच्या आणि मोबाईल इंजिनियर्सना अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली होती.मोबाइल कनेक्टिव्हिटीची महत्वाची वैशिष्ट्ये गमावल्यामुळे आता संप्रेषण नेटवर्कला धोका निर्माण झाला आहे. कॅबिनेट मंत्री मायकेल गोव्ह यांनी या गोष्टी आणि अफवा मात्र फेटाळल्या आहेत. निव्वळ मूर्खपणा आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं.

हे वाचा-हॉटस्पॉट भागात राहणारे लोक काय करू शकतात आणि काय नाही? जाणून घ्या सर्व माहिती

सोशल मीडियावर कोरोनासंदर्भातील बऱ्याच पोस्ट फिरत आहेत. अशा पद्धतीच्या पोस्टवर गुगलकडून कारवाई करण्यात यावी यासंबंधिचे आदेश देण्यात आले आहेत. अफवा पसरवणारे किंवा 5G संदर्भात चुकीची माहिती देणारे सर्व व्हिडीओ हटवण्यात येईतील असं आश्वासन गूगलनं दिलं आहे.

टॉवरच पेटवला- 5G टेक्नोलॉजीमुळे कोरोना पसरतो या अफवेमुळे ब्रिटनमध्ये अनेक मोबाईल फोनचे टॉवर्स जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रिटनची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीटी (ब्रिटीश टेलिकॉम) च्या मोबाइल टॉवरला आग लागली. याद्वारे हजारो लोकांना 2 G, 3 G, 4 G आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुविधा दिली जात होती. या टॉवरवरून 5 जी कनेक्टिव्हिटीची सुविधा मात्र दिली जात नव्हती.

हे वाचा-कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठी मदत, 'या' अरबपतीने दिली 7500 कोटींची देणगी

5 G टेक्नोलॉजीतून पसरत नाही कोरोना

ब्रिटनच्या राष्ट्रीय हेल्थ सर्विसचे डायरेक्टकर स्टीफन पोविस यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. 5G टेक्नोलॉजितून कोरोना व्हायरस पसरत नाही. ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.मोबाईलचं नेटवर्क आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवून चुकीचं केलं तर त्याचा त्रास आरोग्य सेवांवर होऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहा असं आवाहन करण्यात आलं आहे.

हे वाचा-मॉब लिंचिंगचा गंभीर प्रकार, कोरोनाच्या संशयावरून लाथा-बुक्क्यांनी तरुणाची हत्या

संपादन- क्रांती कानेटकर.

First published: April 9, 2020, 11:56 AM IST

ताज्या बातम्या