ब्रिटेनने घेतला सुटकेचा नि:श्वास; हाय रिक्सच्या नागरिकांनाही घराबाहेर जाण्याची परवानगी

ब्रिटेनने घेतला सुटकेचा नि:श्वास; हाय रिक्सच्या नागरिकांनाही घराबाहेर जाण्याची परवानगी

जगातील विविध देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. कित्येक आठवड्यांनी नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

  • Share this:

लंडन, 31 मे : ब्रिटनमध्ये हाय रिस्कमध्ये असलेल्या लोकांनाही घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये आता कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका जास्त असलेले कोट्यवधी लोक आपल्या घराबाहेर पडू शकतील. गेल्या 10 आठवड्यांपासून ते त्यांच्या घरात कैदेत होते. आता शासनाच्या परवानगीनंतर त्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये आता हजारो लोकांमध्ये  फक्त एका व्यक्तीला कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे.

22 लाख लोकांनी घेतला सुटकेचा श्वास

द सनच्या एका वृत्तानुसार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उद्या एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानुसार कोरोना विषाणूमुळे जास्त धोका असलेले ब्रिटेनच्या 22 लाख ब्रिटिश लोक घरातून बाहेर पडू शकतात. पंतप्रधान वृद्धांसाठीदेखील हा नियम लागू करू शकतात.

ब्रिटेनने घरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना बाहेर जाऊन आपल्या मित्र परिचितांना भेटण्याची परवानगी दिली आहे. ते एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात. यावेळी त्यांना सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे लागेल.

लोकांना 10 आठवड्यांनंतर स्वातंत्र्य मिळेल

या नवीन घोषणेनंतर मोठ्या संख्येने लोक सुटकेचा नि: श्वास घेऊ शकतात. इतर रोगांशी झुंज देणारे अनेक लोक कोरोनाच्या भीतीने त्यांच्या घरात तुरूंगातच राहात होते. लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरात राहावे लागत होते.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाशी लढणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करून आपल्या घरी राहिलेल्या सर्व लोकांचेही त्यांनी आभार मानले.

हे वाचा- बँकांकडून लोन घेणं ठरेल फायदेशीर, 1 जूनपासून व्याजदरात होणार कपात

केजरीवाल सरकारकडे वेतन देण्यासाठी नाही निधी; केंद्राकडे मागितली 5000 कोटींची मदत

First published: May 31, 2020, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading