• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • इंग्रज नमले! ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता, भारताच्या दबावानंतर 24 तासात निर्णय

इंग्रज नमले! ब्रिटनकडून अखेर COVISHIELD ला मान्यता, भारताच्या दबावानंतर 24 तासात निर्णय

भारताच्या दबावानंतर अखेर ब्रिटनने कोव्हिशिल्ड लसीला (Britain approves Covishield vaccine after pressure from India) मान्यता दिली असून आपातकालीन वापरासाठीच्या यादीमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भारताच्या दबावानंतर अखेर ब्रिटनने कोव्हिशिल्ड लसीला (Britain approves Covishield vaccine after pressure from India) मान्यता दिली असून आपातकालीन वापरासाठीच्या यादीमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या यापूर्वीच्या ट्रॅव्हल पॉलिसीत (International travel policy) भारतातील कोव्हिशिल्डला मान्यता देण्यात आली नव्हती. त्यामुळे कोव्हिशिल्डच्या दोन्ही लसी घेतलेल्या नागरिकांनादेखील ‘नॉन व्हॅक्सिनेटेड’ ठरवण्यात येत होतं. याविरोधात भारताने आवाज उठवत हे धोरण भेदभाव करणार असल्याची टीका केली होती. त्यानंतर 24 तासात ब्रिटननं आपलं धोरण बदललं आहे. काय होतं जुनं धोरण? ब्रिटनने नुकतंच त्यांचं आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबतचं धोरण जाहीर केलं होतं. त्यामध्ये काही लसींना मंजुरी देण्यात आली होती. मात्र या यादीत भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचा समावेश नव्हता. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांनादेखील लसीकरण न झालेल्या नागरिकांसाठीचे नियम लावण्यात येत होते. भारतातून ब्रिटनमध्ये जाणारी प्रत्येक व्यक्ती ही लसीकरण न झालेली असल्याचं गृहित धरलं जात होतं. त्यामुळे प्रत्येकाला सक्तीनं 10 दिवस विलगीकरणात राहावं लागत होतं. भारताच्या दबावानंतर बदलला निर्णय भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटन सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. जगातील अनेक देशांनी कोव्हिशिल्डला मंजुरी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही या लसीला मंजुरी दिली आहे. असं असताना ब्रिटन सरकारचा हा निर्णय भेदभाव करणारा असल्याची टीका भारतानं केली होती. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांसोबत भारत सरकारनं याबाबत बातचित केली होती आणि या धोरणाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली होती. हे  वाचा - घ्यायला गेला थंडा पण झाला मोठा वांदा; Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना ब्रिटननं बदललं धोरण भारताच्या दबानानंतर ब्रिटननं आपलं धोरण बदललं असून आता कोव्हिशिल्ड लसीला आपातलकालीन वापरासाठीच्या यादीत स्थान दिलं आहे. त्यामुळे यापुढे कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या सक्तीच्या विलगीकरणाचा सामना करावा लागणार नाही.
  Published by:desk news
  First published: