ब्रिक्सच्या घोषणापत्रात दहशतवादाशी लढण्याचा निर्धार; भारताचा मोठा विजय

ब्रिक्सच्या घोषणापत्रात दहशतवादाशी लढण्याचा निर्धार; भारताचा मोठा विजय

या निर्धाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाही ब्रिक्सच्या घोषणापत्रात उल्लेख आहे.

  • Share this:

शिओमेन,04 सप्टेंबर: भारत ,रशिया, चीन ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका सहभागी असलेल्या ब्रिक्स बॅंकेची परिषद चीनमध्ये सुरू आहे. या परिषदेत दहशतवादाशी लढण्याचा निर्धार घोषणापत्रात करण्यात आला आहे. हा भारतासाठी मोठा विजय समजला जातोय.

या निर्धाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाही ब्रिक्सच्या घोषणापत्रात उल्लेख आहे. अफझल गुरू हा या संघटनेशी संबंधित होता. हक्कानी, लष्कर ए तोयबा यांच्याकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादाचादेखील ब्रिक्सकडून निषेध करण्यात येतोय.

तालिबान, जैश ए मोहम्मदकडून होणारा दहशतवाद चिंतेचा विषय असल्याचंही बोललं गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 12:30 PM IST

ताज्या बातम्या