मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

उचक्यांनी हैराण झालेत या देशाचे राष्ट्रपती; बोलताही येईना, करावी लागणार सर्जरी

उचक्यांनी हैराण झालेत या देशाचे राष्ट्रपती; बोलताही येईना, करावी लागणार सर्जरी

राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो (Brazil President Jair Bolsonaro) यांना मागील दहा दिवसांपासून सतत उचकी (hiccups) लागत आहे. याच कारणामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयातील आपात्कालीन वार्डात दाखल करण्यात आलं आहे

    ब्रासिलिया 15 जुलै : उचकी लागणं ही बहुतेकदा एक सामान्य गोष्ट मानली जाते. मात्र, तुम्ही असं कधी ऐकलं किंवा वाचलं आहे का, की उचकीमुळे एखाद्याला आपात्कालीन वार्डात (Emergency Ward) दाखल व्हावं लागलं? पण ब्राझीलच्या राष्ट्रपतींसोबत असं घडलं आहे. राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो (Brazil President Jair Bolsonaro) यांना मागील दहा दिवसांपासून सतत उचकी (hiccups) लागत आहे. याच कारणामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयातील आपात्कालीन वार्डात दाखल करण्यात आलं आहे. सरकारचं असं म्हणणं आहे, की या महिन्याच्या सुरुवातीलाच बोल्सोनारो यांनी सर्जरीच्या माध्यमातून डेंटल इम्प्लांट केलं होतं. यानंतरपासून त्यांना उचकी यायला सुरुवात झाली. अशात आता त्यांची आणखी एक सर्जरी करावी लागणार आहे. बोल्सोनारो यांना ब्राझीलची राजधानी ब्रासिलिया येथील सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे त्यांना लागणाऱ्या उचक्यांचं कारण शोधलं जाईल. राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीत असं म्हटलं गेलं आहे, की आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना 24 ते 48 तास निरीक्षणात ठेवलं जाईल. मात्र, त्यांनी रुग्णालयातच राहावं, हे गरजेचं नाही. कोरोनाचा प्रसार रोखणं केवळ देशातील लोकांच्या हातात; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा मागील आठवड्यातच एका स्थानिक रेडिओ स्टेशनसोबत साधलेल्या संवादात बोल्सोनारो म्हणाले, की माझ्यासोबत हे याआधीही झालं आहे. हे औषधांमुळेही झालं असू शकतं. मला चोवीस तास उचकी लागत आहे. मंगळवारी रात्री यामुळे थकवा जाणवू लागल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं, माझा आवाज गेला आहे. जास्त बोलण्यास सुरुवात केली की उचकी परत येत आहे. राज्य सरकारचा पुणे भाजपला दणका, अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचा प्लॅन यशस्वी! सप्टेंबर 2018 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर बोल्सनारो यांना अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागली. राष्ट्रपती झाल्यानंतरही त्यांच्यावर पोटाच्या अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. गेल्या वर्षी त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. मात्र, सौम्य लक्षणे होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नव्हती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Health, Viral news

    पुढील बातम्या