ब्राझिलिया, 20 ऑक्टोबर: जितकं मोठ पद तितकी जास्त जबाबदारी हा तर एक वैश्विक अलिखित नियम आहे. त्यात जर तुम्ही एखाद्या देशाचे प्रमुख असाल तर मग जबाबदाऱ्यांच्या ओझ्याची कल्पनाच नको करायला. एखाद्या देशाचा राज्यकारभार सांभाळणं, ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. ब्राझीलचे (Brazil) राष्ट्रापती जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांना आता ही जबाबदारी पार पाडणं कठीण जात असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बोल्सोनारो यांच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याचं चित्र आहे. विशेषत: कोरोना (Corona) परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळण्यात ते अपयशी झाल्यानंतर त्यांची लोकप्रियतेमध्ये घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर जैर बोल्सोनारो यांनी एक भावनिक वक्तव्य केलं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, जेव्हा खूप कठीण निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा ते अनेकदा बाथरूममध्ये जाऊन रडले आहेत.
कोरोना महामारीतील अपयशामुळे ब्राझीलच्या राष्ट्रापतींची लोकप्रियता रसातळाला पोहोचली आहे. महामारीमुळ ब्राझीलमध्ये आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशात महागाई (Inflation) आणि बेरोजगारीच्या (Unemployment) समस्या शिगेला पोहोचल्या आहेत. त्यामुळे जनता बोल्सोनारो यांच्यावर प्रचंड नाराज आहे. जनमत जवळपास त्यांच्या विरोधात गेलं आहे. अशा स्थितीमध्ये त्यांनी आता लोकांना भावनिक करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हेही वाचा- स्पेनमध्ये वेश्याव्यवसायात झाली वाढ; पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा- या देशातही कोरोनाचा विस्फोट; आता 1 महिन्याचा लॉकडाऊन लावावाच लागला, स्थिती बिकट
सिनेट सादर करणार अंतिम अहवाल
ब्राझील सरकार कोरोना महामारीच्या समस्येला कशा पद्धतीनं सामोरं गेलं याचा तपास सध्या केला जात आहे. मंगळवारपर्यंत सिनेट या तपासाचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. यामध्ये बोल्सोनारोंवर 11 गुन्हे दाखल होऊ शकतात. याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, या तपास समितीचे प्रमुख अलागोआसचे सिनेटर रेनन कॅल्हेरोस यांनी शुक्रवारी (15 ऑक्टोबर) एक रेडिओ मुलाखत दिली. बोल्सोनारोंवर औपचारिकपणे नरसंहार, सार्वजनिक निधीचा अनियमित वापर, स्वच्छतेच्या उपायांचे उल्लंघन, गुन्हेगारीला प्रवृत्त करणे आणि वैयक्तिक बनावट कागदपत्रं सादर करणं यासह इतर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. यासाठी आवश्यक ते पुरावेदेखील उपलब्ध आहेत. मात्र, बोल्सोनारो यांच्यावर असलेल्या कोणत्याही आरोपांबाबत खटला चालण्याची शक्यता नसल्याचं सिनेटर रेनन या मुलाखतीमध्ये म्हणाले होते.
हेही वाचा- लोकप्रिय कलाकारानं सोन्याचे तांदूळ सोडले नदीत, एका संदेशासाठी केला लाखोंचा खर्च
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President