ब्राझिलिया, 20 सप्टेंबर : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. सलूनमध्ये केस कापायला गेलेल्या मुलाच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ब्राझिलियामध्ये एका सलूनमध्ये हा सगळा प्रकार घडला. केस कापत असताना हा मुलगा सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रिमिंग करत होता. त्यानंतर सलूनच्या CCTVमध्ये हा सगळा गोळीबार कैद झाला.
या सगळ्या गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जवळजवळ 25 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. मीडिया रिपोर्टनुसार, एक मुलगा शहरातील एका सलूनमध्ये केस कापत असताना. काही गनमॅन तेथे आले, आणि त्यांनी सलून लुटण्याच्या बेतात गोळीबार करण्यात सुरुवात केली. याचवेळी एकाने खुर्चीत बसलेल्या मुलाच्या डोक्यात गोळी घातली.
वाचा-बापाला हवा मुलगा; बाळाचे लिंग पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोटच कापलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाच्या डोक्यात आणि छातीत दोन गोळ्या लागल्या. या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीने पोलीस सध्या या गनमनचा शोध घेत आहेत.
वाचा-नागपुरात चाललं काय? गुंडांचा भरचौकात पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला, LIVE VIDEO
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण अमेरिकेच्या कोलंबिया येथीही असाच प्रकार घडला होता. काही तरुण मास्क घालून सलूनमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरुवात केला.
वाचा-रोज होत होता दोघांमध्ये वाद, त्याने घरी जावून चिरला मित्राचाच गळा!
हा सगळा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. यात गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता. अद्याप पोलिसांना आरोपीला शोधण्यात यश आले नाही आहे.