जेव्हा नववधू आपला विग फेकून देते...

जेव्हा नववधू आपला विग फेकून देते...

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. पण टेक्सासमधल्या नववधूचा वायरल झालेला हा व्हिडिओ पाहिला तर जगण्याची इच्छा किती दुर्दम्य असते याचं प्रत्यंतर येतं.

  • Share this:

28 मे : कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. पण टेक्सासमधल्या नववधूचा वायरल झालेला हा व्हिडिओ  पाहिला तर जगण्याची इच्छा किती दुर्दम्य असते याचं प्रत्यंतर  येतं . टेक्सासमधल्या जेमी स्टेनबॅार्न या युवतीनं आपल्या लग्नात चक्क प्रथेप्रमाणे बु़के फेकण्याऐवजी  विगच फेकून दिला.

जेमीचं लग्न जाॅन स्टेफनसनशी ठरलं.  दरम्यानच्या काळात कॅन्सर झाल्यानंतर अपरिहार्यपणे येणाऱ्या किमो थेरपीमुळे जेमीचे केस गेले.  लग्न तर अगदी जवळ येऊन ठेपलं  होतं. विग घालून संपूर्ण लग्न सोहळा पार पाडणं सहज शक्य होतं. पण आयुष्यातल्या या महत्त्वाच्या सोहळ्यासाठी जेमीनं निर्णय  घेतला की आपण मूळ रुपातच रहायचं आणि सोहळ्याच्या आधी काही मिनिट जेमीनं आपला विग काढून टाकला. आपण जसे आहोत तसेच या सोहळ्याला  सामोर जाण्याचा तिनं निर्णय घेतला आणि हे धाडसी पाऊल उचललं.

जेमीचा हा व्हिडिओ नेटवर वायरल झालाय. हा जसा कॅन्सरग्रस्तांना खूप प्रेरणा देणारा आहेच पण असे लोक पाहिल्यावर कुजबूज करणाऱ्या, त्यांना टाळणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

(सौजन्य - यु ट्युब )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 04:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading