बीजिंग 14 डिसेंबर : एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या खात्यातून 18 लाख रुपये चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Boyfriend Stolen 18 Lakh from Bank Account). चोरी करण्यासाठी त्याने जी पद्धत वापरली ती ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. सध्या प्रियकरापासून चोर बनलेल्या या व्यक्तीला तुरुंगात तीन वर्ष घालवावी लागणार आहेत. कारण न्यायालयाने या प्रकरणात त्याला दोषी घोषित केलं आहे. ही घटना चीनमधील आहे.
अपहरण आणि गँगरेपची तक्रार निघाली खोटी; नागपुरातील महाविद्यालयीन तरुणीचा बनाव उघड
या व्यक्तीच्या गर्लफ्रेंडने आपल्या फोनमध्ये फेशियल रिकग्निशन (Facial Recognition) अॅक्टिव्हेट केलेलं होतं. अशात जेव्हा ती झोपलेली होती तेव्हा बॉयफ्रेंडने हळूच तिच्या पापण्या उघडून फोन अनलॉक केला. यानंतर त्याने फोनमधील अॅप अनलॉक करून गर्लफ्रेंडच्या खात्यातून तब्बल 18 लाख रुपये तोरी केले.
द टाईम्सच्या रिपोर्टनुसार, स्थानिक न्यायालयाने 28 वर्षीय प्रियकराला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीची ओळख गुपित ठेवून त्याला हुआंग असं नाव देण्यात आलं आहे. नाननिंग शहरात राहणाऱ्या या तरुणाने प्लॅनिंग करून ही चोरी केली. त्याने बराच वेळ गर्लफ्रेंड झोपण्याची वाट बघितली. प्रेयसी झोपल्याचं दिसताच त्याने फेशियल रिकग्निशनच्या मदतीने आधी फोन अनलॉक केला. यानंतर अॅप उघडून पैसे आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. प्रियकराने झोपलेल्या गर्लफ्रेंडच्या पापण्या उघडून तिचा फोन अनलॉक केला.
11 वर्षांच्या मुलाचा प्रताप; सुटाबुटात लग्नात सामील, स्टेजवरील 2 लाख घेऊन लंपास
न्यायालयाने प्रियकराच्या या कृत्याला विश्वासघात म्हणत त्याला तुरुंगात पाठवलं. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हुआंगने गर्लफ्रेंडच्या फोनचं लॉक उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला समजलं की गर्लफ्रेंडने फेशियल रिकग्निशन अॅक्टिव्हेट केलेलं आहे. यानंतर त्याने प्रेयसी झोपण्याची वाट पाहिली. प्रेयसी झोपताच त्याने हे काम केलं.
पीडितेचं नावही गुपित ठेवण्यात आलं आहे. ही महिला मागील वर्षी आपल्या या बॉयफ्रेंडला भेटली होती. यानंतर दोघांच्याही गाठीभेटी होऊ लागल्या. प्रेयसीचा बँक बॅलन्स पाहून प्रियकराच्या मनात चोरीचा विचार आला. त्याने आपल्या गर्लफ्रेंडत्या जेवणात नशेचं औषध टाकलं. यामुळे जेवण करताच ती गाढ झोपेत गेली, यानंतर प्रियकराने चोरी केली. प्रियकराला जुगाराचे व्यस्न लागलं होतं. त्यामुळे तो लाखो रुपयांच्या कर्जात बुडालेला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Shocking news, Theft