मराठी बातम्या /बातम्या /विदेश /धक्कादायक! प्रेयसीला खूश करण्यासाठी त्यानं 6 महिन्यांच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

धक्कादायक! प्रेयसीला खूश करण्यासाठी त्यानं 6 महिन्यांच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

कुणी आपल्या प्रेयसीसाठी कुणाचा खून केल्याचं तुम्ही ऐकलंय? हो, हे वाचून तुम्ही थक्क झालात ना? अशीच एक धक्कादायक घटना वॉशिंगटनमध्ये घडली आहे.

कुणी आपल्या प्रेयसीसाठी कुणाचा खून केल्याचं तुम्ही ऐकलंय? हो, हे वाचून तुम्ही थक्क झालात ना? अशीच एक धक्कादायक घटना वॉशिंगटनमध्ये घडली आहे.

कुणी आपल्या प्रेयसीसाठी कुणाचा खून केल्याचं तुम्ही ऐकलंय? हो, हे वाचून तुम्ही थक्क झालात ना? अशीच एक धक्कादायक घटना वॉशिंगटनमध्ये घडली आहे.

वॉशिंग्टन, 14 मार्च :  गर्लफ्रेंडसाठी काहीतरी खास करणारे बरेच पाहिले असतील. पण कुणी प्रेमाच्या नावाखाली असं निर्घृण कृत्य करेल यावर विश्वास बसतो का? ही धक्कादायक घटना वॉशिंग्टनमध्ये घडली आहे. वॉशिंगटनमधील एलेक्झांड्रियामध्ये राहात असलेल्या हाना बार्कर तिच्या पतीसोबत राहत होती. त्यांना 6 महिन्यांचं बाळ सुद्धा होतं. दरम्यान, दोघांचाही सुखासुखी संसार सुरू होता. पण नंतर त्यांच्या 6 महिन्यांच्या मुलीचं अपहरण झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. पण नंतर जे सत्य समोर आलं ते खरंच अंगावर काटा आणणारं होतं.

बार्कर आणि त्याची प्रेयसी निकोल स्मिथ यांनी पोलिसांना सुरुवातीला काही वेगळंच सांगितलं होतं. निकोल स्मिथने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन लोक त्यांच्या घरात आले आणि त्यांनी 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण केलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा अपहरणकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून 6 महिन्यांच्या मुलीचं अपहरण केलं.’

पण नंतर मिळाला 6 महिन्यांच्या लेवीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

'मेट्रो यूके'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीला लेवी या 6 महिन्यांच्या मुलीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्याच घराच्या जवळ मिळाला. त्या व्यक्तीला या चिमुकलीचा मृतदेह पाहून धक्काच बसला त्यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं.

वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आणि पोलीस बार्कर आणि स्मिथ यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले. चौकशीनंतर जे समोर आलं ते वाचून तुम्हाला आश्चर्चयाचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

चौकशीतून समोर आलं धक्कादायक सत्य -

पोलिसांनी जेव्हा बार्कर आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली तेव्हा काही क्षण त्यांनाच विश्वास बसेना. झालं असं की, बार्कर आणि त्यांची प्रेयसी स्मिथ हे दोघेही त्यांच्या 6 महिन्यांच्या बाळासोबत राहत होते. बार्करची पत्नी स्मिथ नेहमी तक्रार करत असे की बार्कर तिला पुरेसा वेळ देत नाही. त्यामुळे त्यांचं रिलेशनशिप काही वर्कआऊट होत नव्हतं. हे सर्व त्यांच्या 6 महिन्यांच्या बाळामुळे होत असल्याचं ती वारंवार सांगत होती. पण शेवटी त्यांच्या प्रेमाला वेळ मिळावा म्हणून जे नको होतं तेच झालं! पोलिसांनी याप्रकरणाची कसून चौकशी केली तेव्हा याचं सत्य समोर आलं. बार्कर हा  प्रचंड व्यसनी होता. त्याला ड्रग्जचं व्यसन लागलेलं होतं. एके दिवशी बार्कर नशेत असताना त्याचं त्याच्या पत्नीशी जोरदार भांडण झालं. भांडणाच्या वेळी बार्करला त्याची प्रेयसी निकोल स्मिथने 'त्यांच्या 6 महिन्यांच्या बाळाला जाळून मारून टाक' असं रागाच्या भारत सांगितलं. आणि बार्करने क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या 6 महिन्यांच्या मुलीला रागाच्या भरात चक्क जाळून टाकलं.

वाचा - मुंबईत व्यापारी पतीने तीन मित्रांना दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची मुभा

मुलीला जाळल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह घरापासून दूर फेकून दिला. आणि हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांच्या कसून चौकशीनंतर या घटनेतील धक्कादायक वास्तव समोर आलं  आहे. त्यानंतर पोलिसांनी खूनाच्या आरोपाखाली पत दोघांनाही ताब्यात घेतलं. दरम्यान आता बर्कर आणि त्याची पत्नी स्मिथ यांच्यावर खूनाच्या आरोपाखाली एलेक्जेंड्रियात खटला सुरू आहे.

अन्य बातम्या -

मित्रांकडून तरूणाचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न, VIDEO सोशल मीडियात व्हायरल

क्रूरतेचा कळस! नवजात मुलाला आईनंच फेकलं रस्त्यावर

First published: